माझ्या बंधू आणि.., पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईकरांना मराठीतून नमस्कार

माझ्या बंधू आणि..,  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईकरांना मराठीतून नमस्कार

मुंबई : मुंबईकरांना माझा नमस्कार… माझ्या बंधू आणि भगिनींनो, असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पणाच्या कार्यक्रमात भाषणाला मराठीतून सुरुवात केलीय. पंतप्रधान मोदींनी जेव्हा मराठीतून सुरुवात केली तेव्हा उपस्थितांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत केल्याने हा चर्चेचा विषय ठरलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेकदा महाराष्ट्र दौऱ्यात असताना मराठी भाषेतून भाषणे केली आहेत. यावेळी भाषणात त्यांनी म्हंटलं, ‘भारत माता की जय, माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार’ या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सुरुवात केलीय.

दरम्यान, ज्या-ज्या राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असतो त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या राज्यातील भाषेतून सुरुवातीला संबोधन करुन एक प्रकारे कार्यकत्यांमध्ये नवचैतन्य देण्याचं काम केलंय. आजही त्यांनी मराठीतून संबोधन करीत उपस्थितांची मने जिंकल्याचं पाहायला मिळालंय.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरात समृध्दी महामार्गाचं लोकार्पण झालं त्यावेळीही नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली होती. मराठीतून भाषणाला सुरुवात केल्यानंतर मोदी यांनी हिंदी भाषेतून संबोधित केलंय.

सभेला संबोधित करताना ते म्हणाले, आज देशभरात रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरु आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हीटीला देखील यातून फायदा होत आहे. डबल इंजिन सरकारला सामान्य माणसालाही तीच आधुनिक सुविधा, तीच स्वच्छता आणि त्याच विकासाच्या गतीचा अनुभव द्यायचा आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणतून स्वराज्य आणि सुराज्याची स्थापना झालीय. राज्यात डबल इंजिन सरकार आल्यामुळे विकास होत असून मुंबईचा कायापालट करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

आज मुंबईतील महत्वांच्या प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईतील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मेट्रो ट्रेन 2 अ आणि 7 चे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube