Nanded Murder Case : मी आंचलला मुलगी मानणार नाही तर..,; आईच्या भूमिकेने लक्ष वेधलं..
नांदेडमध्ये 19 वर्षीय सक्षम ताटेची हत्या केल्यानंतर सक्षमच्या आईने घेतलेल्या भूमिकेने लक्ष वेधून घेतलंय.
Nanded Murder Case : नांदेडमध्ये एक 19 वर्षीय तरुण सक्षम ताटे याची त्याच्या प्रेयसीच्या भावाने आणि वडिलाने प्रेमसंबंधाला विरोध करत निर्घूणपणे हत्या केल्याची (Nanded Murder Case) घटना घडली. या घटनेनंतर प्रेयसीने थेट प्रियकराच्या घरी जात मृतदेहासोबतच लग्न केल्याचं चित्र समोर आलं. प्रियकर आपल्याला सोडून गेल्यानंतर आता त्याच्याच घरी त्याची बनून राहण्याचा निर्णय या प्रेयसीने घेतला आहे. तर आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा देण्याची मागणीही केलीयं. या संपूर्ण घटनेनंतर सक्षम ताटे या प्रियकराच्या आईनेही मोठी भूमिका घेतलीयं. आता माझ्या सक्षमप्रमाणे मी आंचलला माझा मुलगा मानणार असल्याचं आईने म्हटलंय. आईच्या या भूमिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
मला माझ्या मर्यादा माहिती असल्याने…, मुख्यमंत्री पदाच्या वादावर डी. कें शिवकुमारांचं मोठं विधान
सक्षम ताटे याची आई संगीता ताटे म्हणाल्या, सक्षमच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी आंचल मला पोलीस स्टेशनला भेटली. ती खूप रडली आणि माझ्यासोबत माझ्या घरी आली, असं सक्षमची आई संगीता ताटे म्हणाल्या, “माझ्या गळ्यात पळून ती रडली आणि म्हणाली तुमच्या घरी येते. मी त्या दिवशी तिला घेऊन आले. जसं मी माझ्या मुलावर प्रेम करत होते, तसंच प्रेम मी आंचलवर करेन आणि मी तिला मुलगी मानणार नाही, माझा मुलगा मानणार. तिला माझ्या मुलाचा अधिकार देईन. तिच्यात मी सक्षमला पाहीन,” असं सक्षमची आई म्हणालीयं.
ज्या पक्षात कार्यकर्ते नाहीत…, भाजपमध्ये प्रवेश करताच प्रकाश भोईरांचा मनसेवर निशाणा
तसेच मला मुलगी नाही, माझी स्वतःची मुलगी म्हणून मी तिच्यावर प्रेम करेन. आयुष्यभर आंचलवर प्रेम करेल, जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत प्रेम करेल. तिने माझी साथ नाही सोडली , तर मी पण आयुष्यभर तिची साथ सोडणार नाही,” असा शब्दही सक्षमच्या आईने आंचलला दिला आहे. माझी मागणी आहे की, माझ्या लेकाला न्याय मिळावा. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हा खटला चालवावा, अशी मागणी सक्षमच्या आईने केली आहे.
