Nashik Division Graduate Constituency : पदवीधर निवडणूकीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

Nashik Division Graduate Constituency : पदवीधर निवडणूकीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक ३० जानेवारी २०२३ रोजी पार पडणार आहे. या दिवशी निवडणूक प्रक्रिया मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.

याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२३ रोजी आदेश पारित केले आहेत. यादिवशी मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर बंधनकारक असणार आहे. नियमाचे तसेच कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना कोणत्या मतदान केंद्रात आपले नाव आहे, याची माहिती शोधण्यासाठी निवडणूक आयोगाने एक लिंक तयार केली असून, ही लिंक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या पाचही जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या लिंकमुळे पदवीधर मतदारांना आपले नाव शोधणे खूप सोपे होणार आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ विधान परिषद निवडणूक-२०२३ चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. यासाठी ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे.

मतदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रास जोडलेले आहे याबाबत शोध घेणे सुलभ होण्यासाठी शासनाने https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/ ही लिंक दिली आहे. सदर लिंक विभागातील पाचही जिल्ह्याच्या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे यांनी कळविले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube