नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार द्विधा मनस्थितीत; लहामटे यांनी घेतला ‘हा’ निर्णय

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार द्विधा मनस्थितीत; लहामटे यांनी घेतला ‘हा’ निर्णय

NCP Political Crisis :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. 2) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या गटात कोण व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात कोण याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. अशातच अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असलेले अकोले विधानसभा मतदार संघातील आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. ( MLA Kiran Lahamate Join Sharad Pawar Camp )

या प्रसंगी उपस्थित पत्रकारांशी बोलताना लहामटे म्हणाले, ‘शरद पवार हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर आहे.’ लहामटे यांच्या या वक्तव्यामुळे ते शरद पवार गटात दिसणार हे आता स्पष्ट झाले आहे. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार आहेत. त्यातील तीन आमदार अजित पवारांबरोबर असल्याची चर्चा होती. यात आमदार संग्राम जगताप, नीलेश लंके व डॉ. किरण लहामटे यांचे नाव होते. मात्र लहामटे यांनी आज सकाळीच आपण शरद पवार यांच्या समवेत असल्याचे सांगितल्याने अजित पवार यांच्या गटात आता नगर जिल्ह्यातील किती आमदार राहतील यावर चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादीत लेटर बॉम्ब, ‘त्या’ पत्राबद्दल पवारांच्या खास माणसाने केला खळबळजनक खुलासा…

किरण लहामटे हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे आमदार आहे. 2019 साली त्यांनी भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव केला होता. अकोला मतदारसंघात शरद पवारांना माननारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील जनमानस पाहता लहामटे यांनी शरद पवारांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

तसेच अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर हे अजितदादा गटाचे मानले जातात. त्यामुळे लहामटे यांनी अजितदादांऐवजी शरद पवारांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

आमचा बाप काढणारेच उरले एक फुल दो हाफ! सामनाला उत्तर अन् शेलारांचा ठाकरेंना टोला

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहे. यामध्ये संग्राम जगताप, निलेश लंके व डॉ. किरण लहामटे हे अजितदादांसोबत राहणार असल्याचे बोलले जात होते. पण आता मात्र, यातील लहामटे हे शरद पवारांसोबत आले असल्याचे दिसते आहे. तसेच प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे, रोहित पवार हे आमदार शरद पवारांसोबत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube