Jitendra Awhad : रॅपरला वाचवण्यासाठी आव्हाड घेणार पोलीस स्टेशनमध्ये धाव

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 08T141222.292

NCP Leader Jitendra Awhad :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल ट्विट करत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. शिंदे सरकारवर रॅप करत टीका केली म्हणून सरकारने दोन रॅपरना अटक केल्याचा आरोप आव्हाडांनी केला होता. यावरुन आता आव्हाड  सरकारवर चांगलेच संतापले आहेत. काल त्यांनी ट्विट करत सरकारला खडे बोल सुनावले होते. 2 आतमध्ये घातले पण 20 नवे येतील असे आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

रॅपर उमेश खाडेचे ‘भोंगळी केली जनता’ हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. या गाण्यामुळे उमेश खाडे अडचणीत आला आहे. गाण्याप्रकरणी उमेश खाडे याला वडाळा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उमेश खाडेच्या सुटकेची मागणी केली आहे.

CR Kesavan Join BJP : तीन दिवसात काँग्रेसला तीन धक्के! पहिल्या भारतीय गव्हर्नर जनरलचा पणतू भाजपात

याप्रकरणी आव्हाडांनी ट्वीट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर किती जणांना तुम्ही अटक करणार आहात.’, असा सवाल केला आहे. आता जितेंद्र आव्हाड थेट वडाळा पोलिस स्टेशन ला जाब विचारायला जाणार आहे. त्यामुळे पोलस स्टेशनमध्ये वाद होण्याची देखील शक्यता आहे.

Sharad Pawar… आता सुप्रिया सुळे नॉट रिचेबल आहेत का?

दरम्यान, याआधी देखील त्यांनी एक ट्विट केले होते. “भोंगळी” हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणा-या प्रत्येकालाच अटक करा, असे त्यांनी सरकारला सुनावले आहे.

Tags

follow us