फडणवीसांच्या खेळीला मोदी-शाहांचा आशीर्वाद नाही? 24 तास झाले तरी…

फडणवीसांच्या खेळीला मोदी-शाहांचा आशीर्वाद नाही? 24 तास झाले तरी…

NCP Political Crisis :  राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी  बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा काल (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार यांनी काल राजभवनावर आपल्या समर्थक आमदारांसह शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप शिवसेनेचे इतर मंत्री अन् आमदार सर्व उपस्थित होते. परंतु अजिदादांच्या शपथविधीला  24 तास उलटून गेले असल्याने अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे साधे अभिनंदनाचे ट्विटही समोर आलेले नाही. त्यामुळे अनेक चर्चांणा उधाण आले आहे.

राजकारणात येऊन चूक केलीय.., अजितदादांच्या बंडावर रोहित पवार भावनिक

ज्यावेळी एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हा मोदींनी केलेले ट्विट चांगलेच चर्चेत आले होते. त्या ट्विटमध्ये मोदींनी शिंदे आणि फडणवीसांचे अभिनंदन करत ट्विट केले होते. एवढेच काय तर, जेव्हा 2019 साली देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तेव्हा देखील मोदींनी फडणवीस आणि अजित पवारांच्या अभिनंदनाचे ट्विटे केले होते. फक्त मोदींनीच नव्हे तर 2019 च्या शपथविधीनंतर अमित शाह, नितीन गडकरी या नेत्यांनीदेखील ट्विट करत अजित पवारांचे अभिनंदन केले होते.

अजितदादांना पहिला धक्का : शरद पवारांनी मकरंद पाटलांना बसवलं गाडीत

WhatsApp Image 2023 07 03 At 12.34.39 PM

WhatsApp Image 2023 07 03 At 12.34.39 PM

WhatsApp Image 2023 07 03 At 12.36.17 PM

WhatsApp Image 2023 07 03 At 12.36.17 PM

WhatsApp Image 2023 07 03 At 12.40.33 PM

WhatsApp Image 2023 07 03 At 12.40.33 PM

पण आता अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला 24  तास पूर्ण झाले असून अजूनही मोदी, शाह किंवा भाजपच्या एकाही मोठ्या नेत्याने ट्विट केलेले नाही. त्यामुळे अजित पवारांच्या कृतीला केंद्रीय भाजपचा पाठिंबा आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान,  भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याची आमची माहिती असल्याचे काँग्रेसजे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube