‘…तर तो मराठ्यांचा अन् शेतकऱ्यांचा अपमान’; मिमिक्रीवर शरद पवार स्पष्टच बोलले

‘…तर तो मराठ्यांचा अन् शेतकऱ्यांचा अपमान’; मिमिक्रीवर शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar : माझ्याविरोधात असा काही प्रकार झाला तर तो संबंध मराठ्यांचा आणि शेतकऱ्यांचा अपमान असल्याचं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdip Dhankhad) यांच्या मिमिक्रीवरुन केलं आहे. दरम्यान, कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती धनखड यांची मिमिक्री केल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याची परिस्थिती आहे. या मिमिक्री व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला होता. त्यावर बोलताना शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सिध्दार्थ आनंद यांनाही ‘डंकी’ची उत्सुकता, शाहरुखला शुभेच्छा देत म्हणाले, ‘मीही चित्रपट पाहणार’

शरद पवार म्हणाले, संसदेच्या बाहेर काय झालं, इथं मला काही केलं तर त्याची जबाबदारी सोबत असलेल्या नेत्यांची असते. संसदेच्या बाहेर लोकांनी काही केलं तर त्यावरुन वाद होऊ शकतो. माझ्याविरोधात असा काही प्रकार झाला तर हा मराठ्यांचा अपमान आहे शेतकऱ्यांचा अपमान आहे. कारण मी एक एवढंच म्हणेल की मी मराठा आणि शेतकरी असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

‘मी देखील 20 वर्षापासून असाच अपमान सहन करतोय’; धनखड यांच्या अवमानप्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया

संसदेच्या इतिहासात असं कधीच झालं नाही…
काही दिवसांपूर्वी संसदेत काही लोकं घुसले होते. ते चार लोकं संसदेत आले कसे? त्यांना पास कसा मिळाला? यावर चर्चा व्हायला हवी. चर्चा करण्याचा संसदेचा पूर्ण अधिकार आहे. पण असं न करता या मुद्द्यावर विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर 150 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे.

देशातली जनता हे सगळं पाहत असून त्याची किंमत जनता वसूल करणार, असा मला विश्वास असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच 150 खासदारांना संसदेतून बाहेर काढलं ही चांगली गोष्ट नाही. संसदेच्या इतिहासात असं कधी झालं नाही ते सध्या संसदेत सुरु असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

दरम्यान, संसदेत काही लोकांनी प्रवेश करुन धुर सोडल्याची घटना घडली. या घटनेमुळे संसदेचा प्रश्न ऐरणीवर आला असून हा मुद्दा विरोधकांनी चांगलाच उचलून धरल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर संसदेत गदारोळ केल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या तब्बल 150 खासदारांना लोकसभेच्या सभापतींनी उर्वरित सत्रासाठी निलंबित केलं आहे. त्यावरुनच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे.

दुसरीकडे संसदेच्या बाहेर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या मिमिक्रीवरील घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, धनकड यांची नक्कल करणाऱ्या कल्याण बॅनर्जींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे धनखड यांना अपमानित करण्याचा मुळीच हेतू नव्हता असे म्हणत मिमिक्री एक कला असल्याचे स्पष्टीकरण कल्याण बॅनर्जी यांनी दिले आहे. उपराष्ट्रपतींबद्दल माझ्या मनात खूप आदर असल्याचे सांगत पंतप्रधांनीदेखील मिमिक्री केल्याची संदर्भ बॅनर्जी यांनी यावेळी दिला

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube