अखेर संभाजी भिडेंबद्दल जयंत पाटील पहिल्यांदाच थेट बोलले; दबक्या आवाजातील चर्चांना पूर्णविराम

अखेर संभाजी भिडेंबद्दल जयंत पाटील पहिल्यांदाच थेट बोलले; दबक्या आवाजातील चर्चांना पूर्णविराम

मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा गदारोळ उठला आहे. संतप्त झालेल्या काँग्रेस नेत्यांनी काल विधीमंडळात भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही भिडेचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी सरकारकडे केली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाजी भिडे भाजपाचे पिल्लू असल्याचे म्हटले आहे. (NCP State President Jayant Patil demands action against Sambhaji Bhide in connection with his controversial statement on Mahatma Gandhi)

दरम्यान, या वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पहिल्यांदाचा प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य केले आहे. भिडे यांनी यापूर्वी देखील अनेक अनैतिहासिक आणि अवैज्ञानिक विधाने करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे समाजात दुही माजवणाऱ्या विधानांचा मी वेळोवेळी निषेध करत आलो आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे या देशाच्या निर्मितीमधील योगदान अमूल्य आहे. केवळ भारतातच नाही तर जगभर गांधींच्या विचारांना आदर आणि सन्मान आहे. मनोहर भिडे यांच्यावर सरकारने त्वरित गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.

जयंत पाटील आणि संभाजी भिडेंच्या मधुर संबंधांची चर्चा :

जयंत पाटील आणि संभाजी भिडे यांचे मधुर संबंध असल्याची चर्चा दबक्या आवाजात अनेक वेळा होत असते. दिवंगत नेते आर. आर. पाटील आणि जयंत पाटील यांची पूर्वीपासून संभाजी भिडे यांच्याशी जवळीक असल्याच्या चर्चा अधूनमधून होत असतात. संभाजी भिडे आणि जयंत पाटील दोघेही सांगली जिल्ह्यातूनच येतात. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर अशा पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये संभाजी भिडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अनेक धारकरी या भागात आहेत. त्यामुळे या भागातील राजकारणी भिडे यांच्याशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येतं.

महात्मा गांधीबद्दलचं वक्तव्य महागात! संभाजी भिडेविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी  भिमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेंना क्लीनचिट देण्यात जयंत पाटील यांचा हात असल्याचा आरोप केला होता. तसंच जयंत पाटील संभाजी भिडेंच्या पाया पडतात, असाही दावा त्यांनी केला होता. मात्र संभाजी भिडे आणि आपला कोणताही  वैयक्तिक संबंध नसल्याचं पाटील यांनी यापूर्वी म्हणजे 2022 मध्ये भिडे यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर बोलताना स्पष्ट केलं होतं. मी त्यांना कधीही भेटायला जात नाही. यापूर्वी त्यांची भेट घेतलेली नाही, असाही दावा त्यांनी केला होता. मात्र आता जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच भिडे यांच्याविरोधात स्पष्टपणे भूमिका घेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, बावनकुळे म्हणाले, त्यांचं वक्तव्य…

काय म्हणाले होते भिडे?

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube