30 जूनची मुदत उलटल्याने शेतकरी कर्जमाफीला नवी डेडलाईन; कृषीमंत्री भरणेंची मोठी माहिती
farmer loan waivers 30 जून ही तारीख उलटून गेल्याने आता शेतकरी कर्जमाफीला नवी डेडलाईन देण्यात आली आहे.
New deadline for farm loan waivers Agriculture Minister Dattatray Bharne shares update : राज्य सरकारच्या मंगळवार (दि. 2 जून)रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला मान्यता देण्यात आली होती. मात्र, विधान परिषद निवडणुक आचारसंहिता सुरू असल्याने लगेच घोषणा झाली नाही. कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग अटी व शर्ती संदर्भात परिपत्रक काढण्यात येणार आहे असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर 30 जूनपर्यंत ही कर्जमाफी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र ही तारीख उलटून गेल्याने आता शेतकरी कर्जमाफीला नवी डेडलाईन देण्यात आली आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने घट; भारतात इंधनाचे दर कमी होणार?
यावर विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत माहिती दिली. 30 जूनपर्यंत ही कर्जमाफी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र ही तारीख उलटून गेल्याने आता शेतकरी कर्जमाफीला नवी डेडलाईन देण्यात आली आहे. त्यांनी सांगितलं की, आता शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार आहे.
फुटबॉल वर्ल्डकपमध्ये धक्कादायक निकाल ! पॅराग्वेकडून पराभूत होत चार वेळची चॅम्पियन जर्मनी बाहेर
शेतकरी कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. 65 लाखांहून अधिक कर्जखात्यांवरचे कर्ज माफ होणार आहे. कर्जमाफीला मंजुरी मिळाली आहे, पण आचारसंहितेमुळे घोषणा करण्यात आलेली नाही.