‘महाराष्ट्र भूषण’च्या चुकीनंतर सरकाराला उपरती; कार्यक्रमाच्या वेळेसाठी नवा शासन निर्णय

  • Written By: Published:
‘महाराष्ट्र भूषण’च्या चुकीनंतर सरकाराला उपरती; कार्यक्रमाच्या वेळेसाठी नवा शासन निर्णय

Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कार्यक्रमात उष्मादाहामुळे झालेल्या मृत्यूवरून सरकार टीकेचं धनी ठरत आहे.

सर्वच बाजूने टीका होत असल्यामुळे अखेर राज्य शासन यावर निर्णय घेणार आहे. राज्यात पुढील काळात जोपर्यंत उन्हाचे दिवस आहेत. तोपर्यंत १२ ते ५ या वेळेत एकही कार्यक्रम खुल्या मैदानात होणार नाहीत. यासाठी राज्य सरकार नवीन शासन निर्णय घेणार आहे, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

Vinod Tawde Committee Report : भाजपचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ अहवालावर तावडेंचं स्पष्टीकरण…

यावेळी बोलताना लोढा म्हणाले की, महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात जी घटना घडली. ती अत्यंत दुर्दैवी आहे. पण यापुढे अशा घटना होऊ नयेत. यासाठी शासन नवा निर्णय घेणार आहे. अशी माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

नवी मुंबईच्या खारघर येथील सेंट्रल पार्क परिसरात राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन केले होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील दिल्लीहून आले होते. शाह यांच्या उपस्थितीत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमित शाह येणार असल्यामुळं साहजिकच हा कार्यक्रम भरगच्च होणार होता.

या पुरस्कार सोहळ्याला धर्माधिकारी यांच्या लाखो भाविकांनीही हजेरी लावली होती. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात झालेल्या या कार्यक्रमात उष्माघाताने अनेकांचे बळी घेतले, तर शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यानंतर राज्य सरकारने मृतांच्या कुटूंबियांना तातडीनं मदत जाहीर केली. मात्र, सरकारने जाहिर केलेली ही रक्कम तोकडी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यावर टीका केली आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. अशी गंभीर टीका त्यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube