आम्ही तांबे-विखेंचा वाद.., खासदार सुजय विखेंकडून नवा खुलासा

आम्ही तांबे-विखेंचा वाद.., खासदार सुजय विखेंकडून नवा खुलासा

अहमदनगर : जिल्ह्याने नेहमी थोरात (Thorat) आणि विखे (Vikhe) घराण्यामध्ये वाद पाहिला असून तांबे आणि विखेंचा वाद आम्ही होऊ दिला नसल्याचं खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी स्पष्ट केलंय. ते आज अहमदनगरमध्ये आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी आगामी काळात सत्यजित तांबेंबद्दलची(Satyajeet Tambe) आपली भूमिका काय असणार हेदेखील स्पष्ट केलं आहे.

पुढे बोलताना सुजय विखे म्हणाले, आजपर्यंत अहमदनगर जिह्यात नेहमी थोरात-विखे यांच्यातील वाद होत असतं. हा वाद संपूर्ण जिह्याने पाहिला आहे. मात्र, विखे आणि तांबेंमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा वाद होऊ दिलेला नाही, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर सत्यजित तांबे आणि आम्ही एकत्रितपणे काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

तसेच नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यातबाबतही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाचा नसून अहमदगरमधील भाजपच्या नेत्यांचा आहे. यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, यांच्यासह इतर नेत्यांच्या विचार विनिमयानंतर आम्ही सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यात आल्याचं सुजय विखे यांनी सांगितलं.

तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी कोणत्याही पक्षाला आपला अधिकृत उमेदवार देता आलेला नाही. या मतदारसंघासाठी सुशिक्षित लोकांच्या विकासासाठी सक्षम असा उमेदवार हवा असतो. सत्यजित तांबे सुशिक्षित लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, काही गोष्ट निवडणूक होईपर्यंत पडद्याआड असतात, या गोष्टी आता निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार असल्याचं सूचक वक्तव्य सुजय विखेंनी केलंय. आता राज्यातील पाच पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान पार पडंलयं. येत्या 2 तारखेला या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमदेवार सत्यजित तांबेंबाबत कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube