Video : वाजपेयींना सर्व घाबरायचे, मोदींना कुणी घाबरत नाही; पहलगामवरून जरांगेंनी पेटवला नवा वाद

Video :  वाजपेयींना सर्व घाबरायचे, मोदींना कुणी घाबरत नाही; पहलगामवरून जरांगेंनी पेटवला नवा वाद

No one afraid to Narendra Modi; Jarange sparks controversy after Pahalgam attack : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात भारताकडून पाकिस्तानची विविध बाजूंनी नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयार असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी पहलगाम हल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

कॉंग्रेसचा कार्यकर्ता अस्वस्थ, केवळ नॅरेटीव्हवर काम करून पक्ष वाढत नाही; बावनकुळेंचा हल्लाबोल

पहलगाम हल्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, पहलगामवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना तर आतापर्यंत मारून टाकायला हवं होतं. भारत सरकार नुसते विमान पळवातात. कुठं तळ नाही हे म्हणतात पाणी बंद केलं. कुठं बंद केलं ? असा प्रश्न ही मोदी सरकारला विचारत हे विमान पळवतात व फक्त डिझेल जाळत आहेत. सगळा देश यांच्या पाठीशी आहे. मात्र हे काहीच करत नाही. अटल बिहारी वाजपेयी यांना सर्व घाबरत होते. मोदींना कुणी घाबरत नाही, हे नुसतं लाडक्या बहिणी सारख फसवत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांचा दरारा होता, यांना कुणी भीत नाही. असं म्ङणत जरांगे यांनी भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

पहलगामच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्याची आत्महत्या

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील टांगीमर्ग येथे चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका तरुणाने पळून जाण्याच्या प्रयत्नात नाल्यात उडी मारली. यामध्ये त्याचा बुडून मृत्यू झाला. तरुण पाण्यात उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, हा तरुण दहशतवाद्यांचा साथीदार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (Attack ) दरम्यान, पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी याला संशयास्पद म्हटलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. २३ वर्षीय इम्तियाज अहमद मगरे हा अहरबल परिसरातील रहिवासी होता.

Purandar Airport : तुम्हाला जमीन द्यायची नाही, पण सरकारला हवीये, हट्ट सोडा, 7 दिवसांत….; बावनकुळे काय म्हणाले?

इम्तियाजला शनिवारी टांगीमार्ग परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशीदरम्यान त्याने कबूल केलं की त्याने दहशतवाद्यांसाठी जेवण आणि इतर गोष्टींची व्यवस्था केली होती. सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, चौकशीच्या आधारे त्याला दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणी नेले जात होते. पोलीस आणि सैन्याचे संयुक्त पथक त्याला रविवारी सकाळी दहशतवाद्यांच्या संभाव्य ठावठिकाणाकडं घेऊन जात होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि विश्वा नदीत उडी मारली पण पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube