Ahmednagar : गडाखांना झटका ; दूध संघ वीजचोरी प्रकरणी गुन्हा
अहमदनगर : दहा वर्षांपूर्वी घडलेल्या नेवासे तालुका दूध संघाच्या वीजचोरी प्रकरणी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत गडाख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यामध्ये 2012 ते 2015 सालच्या संचालक समितीच्या सदस्यांचा समावेश आहे.
'आत्तापर्यंत 21 जिल्ह्यांचा दौरा'#RupaliChakankar https://t.co/Z06PmEDVZt
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 2, 2023
वसई महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय सुदर्शन सिंह यांनी अहमदनगर तालुका पोलिस ठाण्यात वीजचोरीप्रकरणी फिर्याद दिली होती. ती फिर्याद सोनई पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आलीय.
Chandrkant Khaire : संजय राठोड पैशांशिवाय कामच करीत नव्हते…
विनय सिंह यांच्या फिर्यादीनंतर आमदार शंकर गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख, प्रवीण गडाख, गणपत चव्हाण यांच्यासह अन्य 16 जणांवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली आहे.
पोलिसांकडून अद्याप गडाख यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली नसून राजकीय अस्तित्व आणि वैयक्तिक जीवन उध्वस्त करुन खच्चीकरण्यासाठी विरोधकांचा डाव असल्याची प्रतिक्रिया आमदार शंकर गडाख यांनी दिलीय.
धंगेकरांचा अप्रत्यक्ष प्रचार करणे ही महागात पडले : मनसेतून थेट हकालपट्टी
तसेच दहा वर्षांपूर्वीच्या वीजचोरीचा गुन्हा आता दाखल झाला, यातच सर्व काही आले. न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास असून तालुक्यात मेळावा घेऊन वस्तुस्थिती मांडली जाणार असल्याचे आमदार गडाख यांनी स्पष्ट केले आहे.