Ahilyanagar : दुसऱ्याशी जवळीक वाढली, त्याने चाकूनेच ओरबाडून काढली..10 वर्षांच्या प्रेमाचा असा शेवट!
अहिल्यानगरच्या भिंगारजवळील वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयातील महिला सफाई कर्मचाऱ्याची हत्या झाल्याची घटना 27 ऑक्टोबर रोजी घडली.
Ahilyanagar Crime : अहिल्यानगरच्या भिंगारजवळील वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयातील महिला सफाई कर्मचाऱ्याची हत्या (Ahilyanagar Crime) झाल्याची घटना 27 ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी संतोष धोत्रे यानेच महिलेची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीयं. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामपंचायत कर्मचारी संतोष धोत्रेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
दुष्काळाचे गांभीर्य विसरले, उत्सवात लाखोंची उधळपट्टी…कोपरगावकरांमध्ये चर्चेला उधाण…
अनिता देविदास आळकुटे(42) असं मृत महिला कर्मचाऱ्याचे नाव असून संतोष धोत्रे आणि मृत महिला दोघेही वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार दोघांमध्ये मागील 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अनिता यांची दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक वाढल्याच्या संशयातून संतोष धोत्रे याने अनिता यांच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात अनिता यांचा जागीच मृत्यू झाला.
अनिता आणि संतोष यांच्यात गेल्या दहा वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती आहे. अनिता यांचे अन्य व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय संतोष याला आल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. याच संशयातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनीही पाहणी केली.
जरांगेंच्या कथित ऑडिओप्रकरणी SIT स्थापन होणार ; CM फडणवीसांचे मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश
मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. अनिता यांचा मुलगा योगेश आळकुटे याची फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, संशयित संतोष धोत्रे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येमागील नेमके कारण आणि घटनाक्रमाचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाणे करत आहे. दरम्यान, दोघांचेही दहा वर्षांचे प्रेमसंबंध होते, अनिता यांचे संतोषशी प्रेमसंबंध असताना दुसऱ्या प्रियकराचा संशय आल्याने संतोषने हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.