“ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही, मुख्यमंत्री भुजबळांशी चर्चा करतील”, सामंताचं स्पष्ट वक्तव्य
ओबीसींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करतील.

Uday Samant on Maratha Reservation : अहिल्यानगर मराठा आरक्षणाचा जीआर निघाल्यानंतर ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आक्रमक पवित्र घेतला आहे. दरम्यान ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही तसेच गरज पडल्यास राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करतील. वेळ पडल्यास मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही याबाबत चर्चा करून योग्य तोडगा काढतील असे वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
मंत्री उदय सामंत आज (Uday Samant) नगरमध्ये होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सामंत म्हणाले, हैदराबाद गॅझेटसाठी समिती तयार करण्यात आली त्याचा सदस्य मी होतो. हैदराबाद गॅझेट जाहीर करत असताना ओबीसी समाजाचे कोणतेही आरक्षण कमी होऊ नये याची दक्षता घेऊनच जीआर काढण्यात आलेला आहे याचा खुलासा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तरी काही गैरसमज असतील तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ते दूर करतील.
ओबीसींच्या हक्कासाठीही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे वेळ पडल्यास दोन्ही समितीचे अध्यक्ष एकत्र चर्चा करू शकतात. एकमेकांच्या शंका या माध्यमातून दूर करू शकतात. ओबीसी समाजावर कुठल्याही (Maratha Reservation) प्रकारचा अन्याय होणार नाही ही महायुती सरकारची भूमिका आहे असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला बोगस प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. यावर बोलताना सामंत म्हणाले, कोणतेही बोगस प्रमाणपत्र दिले गेले तरी तातडीने रद्द होते जर खोटे प्रमाणपत्र असतील तर ते आपण रद्द करतो. चंद्रशेखर बावनकुळे चर्चा करतील परंतु समाजामध्ये तेढ निर्माण होणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी योग्य नाही असं माझं वैयक्तिक मत आहे.
Uday Samant : “शरद पवार गटाला नवा ज्योतिषी मिळाला”, आव्हाडांच्या वक्तव्यावर सामंतांचा खोचक टोला
याबाबत स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करतात. अजूनही त्यांच्या मनामध्ये जर शंका असतील तर त्या दूर करता येतील. भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी एखादी भूमिका घेतल्यानंतर त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. त्यांच्या मनातली शंका विखे पाटील दूर करू शकतात आणि आमच्या मंत्रिमंडळातील जेष्ठ सर्व सहकारी देखील दूर करू शकतात.
नगर मनमाड रस्त्यावरून राहुरीकरांकडून रस्ता रोको करण्यात आला मी देखील या रास्ता रोकोमध्ये अडकलो असतो नागरिकांच्या भावना जनतेच्या योग्य आहे आमच्या देखील पदाधिकाऱ्यांनी आता मला सांगितले की असा पाठपुरावा मंत्री म्हणून मी त्यांना गरजेचे आहे असे विखे पाटील साहेबांना सोबत घेऊन या संपूर्ण रस्त्याच्या बाबतीमधला चर्चा करू आणि भविष्यामध्ये अहिल्यानगर वासियांना आंदोलन करावा लागणार नाही ही महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे.