व्हेरिफिकेशन केल्याशिवाय प्रमाणपत्र देणार नाही; विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं.
व्हेरिफिकेशन केल्याशिवाय प्रमाणपत्र दिले जाणार नाही. कुणालाही खोटे प्रमाणपत्र देणार नाही.

Radhakrishna Vikhe on Maratha Reservation : राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्यासाठीचा जीआर काढला आहे. या माध्यमातून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कार्यवाही केली जाणार आहे. या जीआरमुळे ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात येणार असल्याचं मत ओबीसी नेत्यांनी व्यक्त केलं आहे. या जीआरला कडाडून विरोध केला आहे. तसेच न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला आहे. यातच राज्य सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांनीही बोगस प्रमाणपत्रांचे वाटप होऊ नये असे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता राज्याचे जलसंपदा मंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्हेरिफिकेशन केल्याशिवाय प्रमाणपत्र दिले जाणार नाही असे विखे पाटील म्हणाले आहेत.
हा जनावर, याला नेपाळ, नागालँडला सोडायला हवं; जरांगेंचं भुजबळांना खोचक प्रत्युत्तर
कृषी उत्पन्न बाजार उपसमितीचे भूमिपूजन कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर व कुणबी प्रमाणपत्रावर विखे (Maratha Reservation) यांनी महत्वाचे भाष्य केले. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात बोगस प्रमाणपत्र वाटप होऊ नये असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी (Pankaja Munde) केलं होतं यावर मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कुणालाही खोटे प्रमाणपत्र देणार नाही
हैदराबाद गॅझेटसंदर्भात याचिका दाखल झाली आहे त्यावर देखील विखेंनी मत व्यक्त केले. सध्या ही न्यायप्रविष्ट बाब असून ओबीसी बांधवांचा गैरसमज दूर करू असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला आहे. व्हेरिफिकेशन केल्याशिवाय प्रमाणपत्र दिले जाणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केले आहे. कुणाला चुकीचे आणि खोटे प्रमाणपत्र मिळणार नाही असा शब्द राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिला.
ओबीसींचं आरक्षण संपवलं म्हणत युवकाने जीवन संपवलं; मुंडे-भुजबळांकडून कुटुंबियांचं सांत्वन