Ahmednagar News : राष्ट्रीय शिक्षण धोरणावर अहमदनगरमध्ये कार्यशाळेचे आयोजन
Ahmednagar News : राज्यात यंदा सुरू झालेल्या शालेय शैक्षणिक वर्षापासून नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू करण्यात आले आहे. मात्र यामध्ये शिक्षणामध्ये कायाका बदल होणार आहेत. त्याचे विद्यार्थी पालक आणि शाळांवर काय परिणाम होणार आहेत. हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना देखील माहित असणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणावर अहमदनगरमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ( Ahmednagar College Arranged workshop on National education policy )
‘अहो शरदराव कुणी कोणत्या जातीत जन्माला यावे…’; सुषमा अंधारेंची शरद पोंक्षेंवर परखड टीका
अहमदनगर शहरातील भास्कर पांडूरंग हिवाळे शिक्षण संस्थेचे अहमदनगर महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय शिक्षण धोरणावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना यंदा सुरू झालेल्या शालेय शैक्षणिक वर्षापासून नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
T20 World Cup 2024: आयर्लंडनंतर, आणखी एका संघाला T20 विश्वचषकाचे तिकीट, 15 संघ झाले निश्चित
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसाद रसाळ हे होते. तसेच यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर प्रितम बेदरकर यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठ विभाग आणि एनएनएसचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते.