Ahmednagar Crime : लिफ्टच्या बहाण्याने चोरट्यांकडून एकाचा खून; पोलिसांनी 24 तासांच्या आत ठोकल्या बेड्या
Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामध्ये आता जिल्ह्यातील राहाता येथे एका रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला या चोरट्यांनी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटार सायकलवर बसवून निर्जनस्थळी नेऊन लुटण्याचे उद्देशाने चाकुने मारुन जखमी केले. मात्र यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशी कबूली या गुन्हेगारांनी दिली आहे. (Ahmednagar Crime thieves killed a man by protest lift police arrested in 24 hours )
मतदारसंघात येऊन जे करायचं ते करा; रोहित पवारांचं भुजबळांना खुलं आव्हान
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या जबरी चोरीच्या उद्देशाने खुन करणाऱ्या सराईत आरोपीसह एकास चोवीस तासाच्या आत अटक केली आहे. जबरी चोरीच्या उद्देशाने खुन करणारे सराईत आरोपीसह एकास २४ तासाच्या आत अटक ही घटना अशी की, मयत भाचा सुधीर अशोक कांदे वय ३५, रा.गोंधवणी, ता.श्रीरामपूर यास अनोळखी इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार हत्याराने भोसकुन,जखमी करुन जिवे ठार मारले होते. या घटनेबाबत सुधीर यांचे मामा नवनाथ दादासाहेब चौधरी यांनी तक्रार केली होती.
‘ती’ ऑडिओ क्लिप ते फडणवीसांची अवस्था? उद्धव ठाकरेंनी सगळचं बाहेर काढलं…
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, यांना उघड खुनाचे गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व तपास करुन संशयित आरोपी मयुर काळे व किरण काकफळे यांना दोघांना श्रीरामपूरमधून शिताफीने ताब्यात घेतले.