Ahmednagar जिल्ह्यातून चारा वाहतुकीवर बंदी; मंत्री विखेंची माहिती

Ahmednagar जिल्ह्यातून चारा वाहतुकीवर बंदी; मंत्री विखेंची माहिती

Ahmednagar News : अहमदनगर जिल्‍ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्‍याने परिस्थिती गंभीर बनली आहे. खरीपाचेही काही अंशी क्षेत्र वाया गेले आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर पशुधनाकरीता चार उपलब्‍ध करुन देण्‍याचे आवाहन विचारात घेवून अंतरजिल्‍हा चारा वाहतुकीवर बंदी घालण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आता नंबर काँग्रेसचा; विखेंच्या दाव्याने खळबळ!

काकडी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, यावर्षी पावसाने दडी मारल्‍याने मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अद्यापही काही भागात पावसाने हजेरीही लावलेली नाही. अनेक जिल्‍ह्यांमध्‍ये ठरावीत क्षेत्रातच पाऊस झाल्याने परि‍स्थिती गंभीर आहे. नगर आणि मराठवाड्यात फारशी वेगळी परिस्थिती नाही. धरणातील पाणी पिण्‍यासाठी आरक्षित करावे लागेल. या सगळ्या परिस्थितीवर मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत विस्‍ताराने चर्चा होवून शासन योग्‍य करेल.

मंत्रीपद मिळालं नाही तर नारायण राणे मला..; गोगावलेंनी सांगितले आमदारांच्या मंत्रीपदाचे किस्से

प्रामुख्‍याने पशुधनासाठी चारा उपलब्‍धतेचे मोठे आव्‍हान असून यासाठी सरकारच्‍या वतीने नवीन धोरण आणणार आहे. परंतू तातडीचा उपाय म्‍हणून अंतरजिल्‍हा चारा वाहतुकीला बंदी घालण्‍याचा निर्णय घेतला आहे. यामध्‍ये आणखी एक पाऊल पुढे टाकून ज्‍या भागामध्‍ये पाणी आहे, त्‍या ठिकाणी शेतकरी चारा पिक घेणार असतील तर शासन हा उत्‍पादीत झालेला चारा शेतक-यांकडून विकत घेण्‍यास तयार आहे. यासाठी चारा खरेदीचे दरही निश्चित करण्‍याच्‍या सुचना आधिका-यांना दिल्‍या असल्‍याचे ना.विखे पाटील म्हणाले.

लम्पी आजाराच्‍या बाबतीत विभागाच्‍या आधिका-यांना पुन्‍हा नव्‍यानेस सुचना देण्‍यात आल्‍या असून, आमचे सर्व आधिकारी पुन्‍हा गावपातळीवर जावून लम्पि आजाराबाबत उपाय योजना करीत आहेत. राज्‍यात लसिचा दुसरा डोस देण्‍याची माहीती सुरु झाली असून, ५५ टक्‍के जनावरांचे लसीकरण पुर्ण झाले असल्‍याकडे लक्ष वेधून, नागपुर येथील महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्य विज्ञान विद्यापीठाच्‍या तज्‍ज्ञांनाही या आजारावर तातडीने उपाय योजना करण्‍याबाबत सुचना देण्‍यात आल्‍या आहेत. केंद्र सरकारचेही पथक लवकरच राज्‍यास भेट देणार असून, सातत्‍याने येत असलेल्‍या लम्पि साथरोगावर नियंत्रण आणण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍यांच्‍याकडूनही उपाय योजनांबाबत मार्गदर्शन घेणार असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube