Grampanchayat Election : रणधुमाळी! कोण ठरणार गावाचा पुढारी? जाणून घ्या जिल्ह्यातील परिस्थिती
Grampanchayat Election : नगर (Ahmednagar)जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान (Grampanchayat Election)होत आहे. जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदानासाठी एकूण 732 मतदान केंद्रे आहेत. तेथे प्रत्येकी 1 अधिकारी व 4 कर्मचारी असे एकूण चार हजार कर्मचारी मतदानासाठी तैनात आहेत. दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रामपंचायतीसाठी सकाळपासून मतदान (voting)सुरु आहे. दरम्यान कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे (MLA Ram Shinde)व रोहित पवार (Rohit Pawar)यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)आणि मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe)गटात कोणाचे पारडे भारी पडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Nilesh Lanke : नगर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जाहीर करा, अन्यथा… आमदार लंकेंचा प्रशासनाला इशारा
राहाता तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या व एका सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सरासरी 24.40 टक्के मतदान झाले. आज सकाळपासून मतदानाला वेग नव्हता मात्र दुपारनंतर मतदान टक्केवारी वाढू शकते. तर राहुरी तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दुपारपर्यंत सरासरी 26.14 टक्के मतदान झाले. दरम्यान आज सायंकाळपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होऊन उद्या सोमवार, दि.6 रोजी निकालाची घोषणा होणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर कोणाची दिवाळी आणि कोणाचे दिवाळे निघणार हे स्पष्ट होणार आहे.
एकनाथ खडसेंना ह्रदयविकाराचा झटका; तात्काळ एअर ॲम्ब्युलन्स पाठवण्याचे CM शिंदेंचे आदेश
निवडणुकीच्या रिंगणातील आकडेवारी
जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या 1 हजार 701 जागांसाठी 7 हजार 260 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर प्रत्यक्षात 3 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर सरपंच पदाच्या 194 जागांसाठी 1 हजार 311 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर 610 उमेदवार रिंगणात आहे.
मतदान होत असलेल्या ग्रामपंचायती
नगर जिल्ह्यातील तालुकानिहाय मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अकोले 22, संगमनेर 6, कोपरगाव 17, श्रीरामपूर 13, राहाता 12, राहुरी 21, नेवासे 16, नगर 6, पारनेर 7 पाथर्डी 14, शेवगाव 27, कर्जत 6, जामखेड 3 व श्रीगोंदा 9 असून निवडणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतदान केंद्राबाहेर एकाचा मृत्यू
मतदानाच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातून एक दुःखद घटना समोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजीत मतदानानंतर एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. सुनील गांधी असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव असल्याचे समजते आहे. मतदान कक्षाच्या बाहेर आल्यानंतर सुनील गांधी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.