हिवरेबाजारचा ‘असा’ही आदर्श.. कर्जदारांनी केली शंभर टक्के परतफेड
Ahmednagar News : कर्जवसुली करताना अनेक बँका, सोसायट्यांची दमछाक होत असताना आदर्शगाव हिवरेबाजारने या क्षेत्रातही दमदार कामगिरी केली आहे. हिवरेबाजार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने शंभर टक्के वसुलीची परंपरा सलग 14 व्या वर्षी कायम राखली आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी 3 कोटी 9 लाख 76 हजार रुपये पीककर्ज भरणा करून कर्जाची परतफेड करत एक नवा आदर्श निर्माण केला.
संस्थेच्या सभासदांना याही वर्षी 14 टक्के लाभांशाचे वाटप करण्यात आले. आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के वसुली करण्यात यश मिळाले.
सभासदाने कर्जाची परतफेड केल्याने हे यश संस्थेला साध्य करता आले. यासाठी सोसायटीच्या सभासदांबरोबरच संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांसह अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
मोदीच तारणहार ! कर्नाटक राखण्यासाठी करणार तुफान प्रचार; ‘हा’ आहे भाजपचा प्लॅन
आदर्शगाव हिवरेबाजारने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामविकासाचा गावाचा आलेख कायम उंचावत राहिला आहे. त्यामुळेच तर हे गाव आज जगाच्या नकाशावर आले आहे. देश विदेशातील लोक येथे कायम येत असतात. गावातील विकासकामांची माहिती घेत असतात.
ग्रामविकासा प्रमाणेच गावातील सेवा संस्थाही चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना ग्रामस्थांचीही साथ मिळत आहे. त्यामुळेच सलग 14 व्या वर्षी कर्ज वसुलीची परंपरा कायम राखली गेली आहे. अन्य ठिकाणी पतसंस्था, सोसायट्यांना कर्ज वसुलीसाठी मोठे परिश्रम घ्यावे लागतात. तरीही वसुली काही होत नाही. त्यामुळे संस्था दिवाळखोरीकडे वाटचाल करू लागते.
आदर्शगाव हिवरेबाजारने मात्र हे धोके वेळीच ओळखून योग्य नियोजन केले. कर्जदारांना नियमित कर्जफेड करण्याची सवय लावली. त्याचे फायदे काय आहेत. याचीही माहिती दिली. त्याचा परिणाम आज असा झाला की संस्थेच्या कर्जदाराने त्याच्याकडील कर्जाची वेळेत परतफेड केली.