मराठा आरक्षणासाठी तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन; नगर जिल्ह्यातील थरारक घटना…

मराठा आरक्षणासाठी तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन; नगर जिल्ह्यातील थरारक घटना…

Maratha Reservation Sholay Style Andolan : राज्यात मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation)पुन्हा एकदा वातावरण पेटलं आहे. आरक्षणासाठी सरकारला दिलेली डेडलाईन संपली आहे. त्यामुळे आजपासून मनोज जरांगे (Manoj Jarange)यांनी पुन्हा एकदा उपोषणाची लढाई सुरु केली आहे. दरम्यान समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आता जामखेडमधील (Jamkhed)एका युवकाने अनोखे आंदोलन केले आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा (Kharda)येथील संतोष साबळे या तरुणाने थेट मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरु केले.

Mumbai : भावांना हाताशी धरत बहिणीची चलाखी; रातोरात 100 कोटींच्या जमिनीचा अपहार

मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका संतोष साबळे या तरुणाने घेतली आहे. त्यामुळे सर्व प्रशासन आता चांगलेच कामाला लागले आहेत. दरम्यान घटनेची माहिती समजताच खर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ या टॉवरकडे धाव घेतली.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? शिंदे-फडणवीस दिल्लीला…

पोलीस प्रशासनाकडून संबंधित तरुणाला टॉवरवरुन खाली उतरण्याची विनंती केली. मात्र आरक्षण द्या, तेव्हाच खाली उतरेल असं उत्तर तरुणाने प्रशासनाला दिलं. या तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सध्या प्रशासनाच्यावतीने सुरू आहेत.

आरक्षणाची ठिणगी पुन्हा पेटली…
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीकरिता जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शासनाने आश्वासन देत 40 दिवसांची मुदत शासनाला देण्यात आली होती. मात्र दिलेली मुदत देखील संपली मात्र सरकारकडून अद्यापही काहीएक ठोस पाऊल आरक्षणाबाबत उचलण्यात आले नाही.

म्हणून आजपासून पुन्हा मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी आता मराठा समाजाच्या तरुणांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सरकारला जाग आणण्यासाठी विविध ठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. याच पार्श्वभूमीवर खर्डा येथील संतोष साबळे यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube