नगर हादरलं! 500 जणांच्या जमावाचा कुटुंबावर हल्ला; अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा

नगर हादरलं! 500 जणांच्या जमावाचा कुटुंबावर हल्ला; अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा

Ahmednagar News : अहमदनगरमधील राहता तालुक्यातील निर्मळ पिंप्री गावात दोन कुटुंबावर 400 ते 500 लोकांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. निवडणुकीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ‘यांचं मणिपूर करा’ असं म्हणत हल्ला केल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात 71 जणांवर अॅट्रॉसिटीअंतर्गत (Atrocity Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलिकांवरून भाजपमध्ये नाराजी! देवेंद्र फडणवीसांचे थेट अजितदादांना खुले पत्र

नेमकं प्रकरण काय?
हल्ल्याला निर्मळ पिंप्री गावातील ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. फिर्यादीनूसार, काही दिवसांपूर्वी कुटुंबातील मुलाचे गावातील लोकांसोबत वाद झाले होते. हे वाद गावकऱ्यांच्या मध्यस्थीने मिटवण्यात आले होते. या प्रकरणाची पोलिसांत नोंदही करण्यात आलेली होती. त्यानंतर आज बुधवारी 400 ते 500 लोकांच्या जमावाने घरात घुसून टीव्ही उचलून बाहेर फेकला. यासोबतच तीन गव्हाच्या पोते धान्य बाहेर फेकले.

भाजप आमदाराचं IAS परीशी जुळलं सुत! लाखोंचं वऱ्हाड अन् तीन ठिकाणी रिसेप्शन

समोरील गर्दी पाहुन व गर्दीचा आवाज ऐकून महिलेसह घरातील लोकांनी घराचा दरवाजा लावून घेतला. मात्र, त्यानंतर जमलेल्या लोकांनी दरवाजावर लाथा मारुन घरावर दगडफेक केली. घराच्या पाठीमागील शेळयाचे पत्र्याचे शेडनेट पेटवून देण्यात आले. दरम्यान, काही वेळात पोलीस पोहचले आणि त्यांनी जमावाला पांगवले. त्यामुळे मोठी घटना घडण्याचं टळलं.

Satyajeet Tambe : मुख्यमंत्र्यांकडून केवळ घोषणा अमलबजावणी नाही; अंगणवाडी सेविकांप्रकरणी तांबेंचा निशाणा

दोन दिवसांपूर्वी एका हाॅटेवरही मारहाण झाली होती. ते प्रकरण सामोपचाराने मिटवण्यात आले होते. मात्र, एका ग्रामपंचायत सदस्याला अर्वाच्च शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाद पुन्हा उफाळून आल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात घरातील लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे.

Ranbir Kapoor च्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावे वाटतात; असं का म्हणाले दिग्दर्शन वांगा?

दरम्यान, काही पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने या कुटुंबीयांचा जीव वाचला. या हल्ल्यामागे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. संतप्त झालेल्या 400 ते 500 लोकांच्या जमावाने घराची तोडफोड आणि जाळपोळही केली आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात 71 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube