भिंगारमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटांत राडा; दोन्ही गटावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा!

भिंगारमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटांत राडा; दोन्ही गटावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा!

Ahmednagar News : अहमदनगर शहरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या जीवघेणा हल्ल्याच्या घटना थांबल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, नगर शहरानंतर आता भिंगार शहरातही जीवघेणा हल्ला घडवून आणण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. भिंगार शहरातील विजयलाईन परिसरात जमिनीच्या वादातून दोन गटांत तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. बाराबाभळी परिसरस्थित असलेल्या 7 गुंठे जमीनीप्रकरणी हा वाद झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रिया बापट नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 90च्या दशकातील थ्रिलरमध्ये दिसणार मुख्य भूमिकेत

नेमकं प्रकरण काय?

प्रतिक लालबोंद्रे रा. भिंगार याच्या फिर्यादीवरुन प्रतिक लालबोंद्रे, अक्षय हंपे रा. भिंगार यांनी निजाम पठाण यांची पत्नी नगमा निजाम पठाण यांच्याकडून बाराबाभळीस्थित 7 गुंठे जमिनी विकत घेऊन नोटरी केली. ही नोटरी 6/11/2023 रोजी प्रतिक लालबोंद्रे, अक्षय हंपे रा. भिंगार याच्या नावे करण्यात आली आहे. मात्र, नगमा पठाण यांचे पती निजाम यांनी 2022 मध्ये काही अटी आणि शर्तींवर गोवर्धन मोरे रा. बाराबाभळी यांच्या नावे नोटरी करुन विकत दिली होती. सदरची जमीन मूळ मालकाच्या नावे पुन्हा करुन दे, असं अक्षय हंपे याने मोरे याच्या घरी जाऊन सांगितलं, मात्र, ही जमीन मी बबन वाकळे यांना विकली असल्याचा दावा मोरे याने यावेळी केला. दरम्यान, नगमा निजाम पठाण यांच्या 7 गुंठे जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारावरुन हा वाद झाल्याचं दिसून येत आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीत घोषणांचा पाऊस, 400 रुपयांत गॅस सिलिंडर देणार

दि. 18 रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी प्रतिक लालबोंद्रे आणि अक्षय हंपे विजयलाईन परिसरातून जात असतानाच आरोपी नामे विजय साळवे, संदेश सोनवणे, अक्षय साळवे, प्रतिम हरबा, जय ओव्होळ यांनी मोटारसायकलवर येत त्यापैकी विजय साळवे याने हातातील तलवार काढून मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. विजय साळवे याने अक्षय हंपे याच्यावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी हंपेच्या हाताला वार झाल्याने तो जखमी झाला. त्यानंतर पुन्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या घरी गेल्यास जीवे ठार मारु अशी धमकी दिल्याची फिर्याद प्रतिक लालबोंद्रे याने दिली आहे.

Bageshwar Baba : ज्यांना माझी अडचण त्यांनी हाजमाची गोळी खावी; बागेश्वर बाबांनी ‘अंनिस’ला डिवचलं

तर दुसऱ्या गटाकडूनही पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी विजय साळवे याच्या फिर्यादीनूसार साळवे आणि त्याचा मित्र सनी भिंगारदिवे भिंगारकडे येत असताना अक्षय हंपेने फोन करुन विजयलाईन परिसरात बोलावून घेतलं. विजयलाईन परिसरात पोहोचलो असता आरोपी नामे सागर ठोंबरे रा. माळीवाडा, अक्षय हंपे, अभि शेलार, प्रतिक लालबोंद्रे, रोहित शिस्वाल, इतर 5 इसम होते. त्याचवेळी अक्षय हंपे विजय साळवेच्या डोक्यात टणक हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच अभि शेलार आणि रोहित शिस्वाल याने माझा मित्र सनी भिंगारदिवे यास दगड लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केल्याची फिर्याद विजय साळवे याने दिली आहे.

दरम्यान, शनिवारी रात्री घडलेल्या या राड्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांत एका गटातील आरोपी विजय साळवे, संदेश सोनवणे, अक्षय साळवे, प्रतिम हरबा, जय ओव्होळ तर दुसऱ्या गटातील आरोपी सागर ठोंबरे, अक्षय हंपे, अभि शेलार, प्रतिक लालबोंद्रे, रोहित शिस्वाल, इतर 5 इसमांवर परस्परविरोधात कलम 307 ऩूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून नगर शहरासह भिंगार शहरात हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत असल्याचं दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube