Ahmednagar News : नवऱ्याला दारुचं व्यसन; पत्नी अन् भावानेच काढला काटा…
Ahmednagar News : श्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारात चार दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा खून मृत व्यक्तीच्याच पत्नी व भावाने केल्याचे समोर आले आहे. बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर असे मृताचे नाव आहे. तर मयताची पत्नी अनिता व भाऊ मनोज असे आरोपींची नावे आहेत. पती दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणातून हा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूरी, आता महिलांना मिळणार ३३ टक्के आरक्षण
याबाबत अधिक माहिती अशी, महादेवाडी रोडच्या पुलाजवळ एका अनोळखी मयत इसमाचा दोरीने गळा आवळून खुन करण्यात आल्याचे आढळून आले होते. पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयताचे तोंड जाळल्याने अनोळखी आरोपी विरुध्द श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कावेरी पाणी प्रश्न पेटला: बंगळुरूमध्ये विमानसेवा विस्कळीत, 44 उड्डाणे रद्द
घटनेचा शोध लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले. पथकाने घटना ठिकाणचे व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करुन बेवारस मृत इसम हा बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी, रा. सुकेवाडी, ता. संगमनेरचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन मयताचे कुटूंबियांकडे विचारपूस करुन मयत बाबासाहेब गोसावी याची माहिती घेत असताना मयताची पत्नी अनिता व भाऊ मनोज यांचे बोलण्यात विसंगती आढळून आल्याने पथकाने मयताचा भाऊ नामे मनोज गोसावी याचेकडे अधिक सखोल चौकशी केली.
Salaar: प्रभासच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाला अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
त्याने मयत भाऊ बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी यास दारु पिण्याचे व्यसन होते. तो दारु पिऊन आई-वडील व कुटूंबियांना मारहाण करुन सारखा त्रास देत होता. एके दिवशी भाऊ बाबासाहेब गोसावी हा दारु पिऊ त्रास देवू लागल्याने. मी, वहिनी अनिता व चुलत भाऊ सौरभ यांनी बाबासाहेब याला दारु जास्त झाल्याने दवाखान्यात जायचे आहे असे म्हणून स्विफ्ट गाडीत बसवले व रस्त्याने जाताना बाबासाहेब दारुच्या नशेत असताना गाडीतील दोरीने त्याचा गळा आवल्याने तो मरण पावला.
त्यानंतर नगर दौंड रोडवर रेल्वे ट्रॅकजवळ टाकून, त्याची ओळख पटु नये, म्हणुन तोंडावर गाडीतील सिट कव्हर व पेट्रोल टाकुन पेटवून दिले, अशी कबूलीच मयताचा भाऊ मनोज गोसावी याने दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनोज किशोर गोसावी वय 36, सौरभ मनोज गोसावी वय 20, अनिता बाबासाहेब ऊर्फ गणेश गोसावी सर्व रा. सुकेवाडी, ता. संगमनेर यांना ताब्यात घेवून श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करीत आहे.