आमदार तनुपरे बनले गुरुजी…; विद्यार्थ्यांना दिले शैक्षणिक धडे, अधिकाऱ्याना दिले ‘हे’ आदेश

आमदार तनुपरे बनले गुरुजी…; विद्यार्थ्यांना दिले शैक्षणिक धडे, अधिकाऱ्याना दिले ‘हे’ आदेश

MLA Prajakt Tanpure Visit School : साधी राहणीमान व उच्च विचारसरणी अशी ओळख असलेले आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांचा असाच प्रत्यय पारनेरमधील सुपा (Supa)येथील एका शाळेला आला आहे. मुंबईहून (Mumbai)परतत असताना आमदार तनपुरे यांनी जिल्हा परिषदेच्या (ZP School)एका शाळेला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवला. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी खुद्द शाळेतील मुलांना शिक्षणाचे धडे दिले. यावेळी तनपुरे यांनी खुद्द हातात खडू घेत फळ्यावर लिखाण करत विद्यार्थ्यांना शिकवले. याभेटीदरम्यान त्यांनी शाळेतील अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन देखील दिले.(Ahmednagar Rahuri MLA Prajakt Tanpure became a teacher Zp School parner Supa)

आमचा तो बाब्या आणि तुमचा तो कारटा…; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

आमदार तनपुरे हे मुंबईहून राहुरीकडे परतत असताना सुपे गावाजवळील पवारवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मनसोक्त गप्पा मारत वेळ घालवला. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर नुकतीच शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे मुलांमध्ये नवीन पुस्तकं, मित्र याबाबत कुतूहल जाणवले. मुले अत्यंत हुशार आणि चुणचुणीत आहेत, अशी भावना यावेळी तनपुरे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री रोजगार निर्मितीत अहमदनगर जिल्हा अव्वल: राधाकृष्ण विखे पाटील

तसेच या शाळेत इयत्ता सातवी पर्यंतसुमारे 100 विद्यार्थी शिकत आहेत. मात्र या सर्व वर्गाना शिकवण्यासाठी फक्त दोनच शिक्षिका आहेत. कामाचा अतिरिक्त भार असूनही त्या अत्यंत प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याकडे असलेली शिकवण्याची आकर्षक कला मुलांच्या व्यक्तीमत्वात अमुलाग्र बदल घडवत आहे.

या शाळेसाठी अजून शिक्षक उपलब्ध व्हावेत यासाठी मी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करून शिक्षकाची नेमणूक करण्याची सूचना केली आहे. गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून शाळा प्रांगणात पेव्हर ब्लॉक्स बसविले आहेत. एक वर्गखोलीसुद्धा बांधली आहे. शाळा प्रशासन आणि गावाच्या योग्य समन्वयाने एक पिढी घडवली जात आहे ह्याचे कौतुक आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube