पथनाट्य व रॅलीच्या माध्यमातून स्तनपानविषयक जनजागृती; रोटरी सेंट्रल व विखे पाटील फाउंडेशनचा उपक्रम

  • Written By: Published:
पथनाट्य व रॅलीच्या माध्यमातून स्तनपानविषयक जनजागृती; रोटरी सेंट्रल व विखे पाटील फाउंडेशनचा उपक्रम

अहमदनगरः स्तनपानविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल व विखे पाटील फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पथनाट्य व रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे.

या वर्षाची थीम ‘इनेबल ब्रेस्टफीडिंग- मेकिंग अ डिफ्रन्स फॉर वर्किंग वुमेन’ ही आहे. हा धागा धरून संपूर्ण सप्ताह विविध मार्गदर्शनपर व्याख्यान, नवीन मातांना स्तनपानासाठी प्रोत्साहित करत त्याचे फायदे व बाळाला कसे दूध पाजले पाहिजे जेणेकरून भविष्यात बाळाचे आरोग्य तर सुदृढ राहतेच परंतु मातेला देखील भविष्यात कंबर व पाठदुखी तसेच वेगवेगळे आजार होता कामा नये, यासाठी आयोजित करण्यात आले होते.

तसेच पथनाट्याच्या माध्यमने माळीवाडा बसस्थानकात स्तनपान विषयक जनजागृती करण्यात आली. नवजात बालकास जन्माच्या एका तासांत आईचे दूध पाजणे त्याचबरोबर पहिल्या सहा महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त आईचे दूध पाजणे आवश्यक आहे हा संदेश स्तनदा माता आणि त्यांच्या कुटुंबाला यावेळी पथनाट्याच्या माध्यमाने देण्यात आला.

तसेच सध्याच्या काळात माता या केवळ गृहिणी नसून काम करणाऱ्या मात असल्याने त्यांच्या कामावर जाण्याने बाळाला स्तनपान करणे शक्य होत नसल्याने कशा पध्दतीने मातेचा दूध काढून ठेऊन त्याला कशा रीतीने त्याला बाळाला द्यावे याकरिता जनजागृती करण्यात आली.

तसेच स्तनपान जनजागृती कामी माळीवाडा बसस्थानकापासून रॅली काढण्यात आली. परिसरातील कुपोषणाचे अधिक प्रमाण असलेल्या काही वस्त्या आणि स्थलांतरित समाजाच्या वस्तीत जावून दोन्ही संस्थेचे वतीने स्तनपान विषयक जनजागृती करण्यात आली.

रॅलीची व स्तनपान सप्ताहची सांगता माळीवाडा बस स्थानकात रॅलीतून येऊन करण्यात आली. या वेळी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे अध्यक्ष हरीश नय्यर यांनी सांगितले की, स्तनपानाचे महत्त्व समाजात सर्वदूर पोहचवण्याकरिता जनजागृतीचा संकल्प या सप्ताह पुरताच मर्यादित न ठेवता वर्षभर रोटरी सेंट्रलच्या माध्यमातून वेगवेगळी उपक्रम राबविले जातील.

त्याचाच एक भाग म्हणून कॅवलरी ऑडिटोरियम येथे येत्या ११ ऑगस्ट रोजी मिलिटरी हॉस्पिटल व सैनिक कल्याण बोर्डच्या सहकार्याने मिलिटरी स्कूल व आर्मी पब्लिक स्कूलच्या मुली व महिलांसाठी या विषयी मार्गदर्शनपर शिबिर तसेच नाट्यसादरीकरण आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी यूथ सर्व्हिसेस डायरेक्टर ईश्वर बोरा, फर्स्ट लेडी डॉ. प्रीती नय्यर, डॉ. कीर्ती कोल्हे, डॉ. श्रेया खाजगीवाले, विनोद बोरा, हितेश गुप्ता, प्रसन्न खाजगीवाले, गणेश शाह, नितिका गुप्ता, चेतन अमरापुरकर, तेजश्री अमरापुरकर, गणेश शाह, अॅड. अभिजित कोठारी, विखे पाटील फाउंडेशनचे नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या प्रतिभा अरुण चांदेकर, उपप्राचार्य योगिता औताडे, कविता रविराज भोकनळ, मनीष तडके, रिबेका साळवे, प्रशांत अंब्रीत, ऐश्वर्या पवार, मोहिनी सोनवणे, श्रद्धा व्यवहारे उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube