Eknath Khadase : मी तुझ्यासारखा भंगारवाला नाही; ऑडिट करणाऱ्या भाजपच्या मंगेश चव्हाणांना खडसेंचा टोला

Eknath Khadase : मी तुझ्यासारखा भंगारवाला नाही; ऑडिट करणाऱ्या भाजपच्या मंगेश चव्हाणांना खडसेंचा टोला

Eknath Khadase on Mangesh Chavhan : जळगावमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात नेहमीच खडाजंगी होत असल्याचं पहायाला मिळतं. त्यात आता पुन्हा एकदा मंगेश चव्हाण आणि एकनाथ खडसे एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसून आले. यावेळी चव्हाणांनी खडसेंचं ऑडिट करणार असल्याचा इशारा दिला. तर त्यावर खडसेंनी आपण पुर्वापार श्रींमत असून तुझ्यासारखा भंगारवाला नाही. अशी टीका खडसेंनी केली आहे. (Eknath Khadase Criticize BJP MLA Mangesh Chavhan for Audit of Khadase )

मोदी जे ठरवतात ते करतातच! शिंदेंनी पवारांसमोरच केलं मोदींचं कौतुक

काय म्हणाले मंगेश चव्हाण?
भाजप आमदार मंगेश चव्हाण हे सोमवारी एका कार्यक्रमासाठी मुक्ताईनगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यामांशी बोलताना खडसे यांच्या विषयाचं ऑडिट होणार असा इशारा दिला. ते म्हणाले, मी एकदा कमिटमेंट केली की, मी स्वतःचं ही ऐकत नाही. खडसे यांच्या विषयाचं ऑडिट होणार आणि सत्य जनतेसमोर येणार आहे. यावर एकनाथ खडसेंनी चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले.

ठाकरे गटाला दणका! आमदार अपात्रतेच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस नकार

काय म्हणाले एकनाथ खडसे?
भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांच्या विषयाचं ऑडिट होणार असा इशारा दिला. त्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, काय ऑडिट करायचं ते कर? मी वडिलो पार्जित श्रीमंत आहे. तुझ्यासारखा भंगारवाला किंवा हमाल नाही. मी एक चांगल्या घरचा आहे. त्यामुळे काय ऑडिट कारायचं ते कर. कारण सरकार तुझं आहे.

पुढे खडसे म्हणाले की, आधीच इडी आणि इन्कम टॅक्स माझ्या मागे लावण्यात आलं आहे. त्यात आता चव्हाणला काय कारयचं ते कर. तुझी कुवत आणि हिंमत काय आहे? स्वतः समाजात काय मान्यता आहे. हे एकदा तपासून पाहा. तसेच एवढीच शक्ती माझं ऑडिट करण्यासाठी लावण्यापेक्षा लोकांच्या कामांसाठी लाव ना. कापसाला भाव द्या ना. यावर बोला ना. तुम्हाला काय काढायचं ते काढा. असं प्रत्युत्तर खडसे यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाणांना दिलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube