Eknath Shinde : आमची युती 25 वर्षांची राष्ट्रवादीचा झेंडा अंगवळणी पडायला वेळ लागेल….

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 07 10 At 5.43.11 PM

Maharashtra politics : भाजप-शिवसेनेची युती 25 वर्षाची आहे. 25 वर्षाची युती असल्यामुळे भाजप-शिवसेनेचे झेंडे लागले आहेत. राष्ट्रवादीचा झेंडा अंगवळणी पडायला थोडा वेळ लागेल. पुढच्या कार्यक्रमात तिन्ही पक्षाचे झेंडे नक्की लागतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून म्हटले.

मुख्यमंत्री पुढं म्हणाले की राज्यातील युतीच्या सरकारला एक वर्ष झाले. सरकारच्या विकास कामाला साथ देण्यासाठी अजित पवार आणि त्यांचे सहकारी आमदार आपल्या सरकारसोबत आले आहेत. त्यामुळे सरकारची ताकद वाढली आहे. आपले आता विकासाचे त्रिशूळ आहे. हे विकासाचे त्रिशूळ पाहून विरोधकांना घडकी भरली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षांची ताकद कमजोर झाली आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा केली जातीय. आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पण बाळासाहेबांचे स्वप्न नरेंद्र मोदी पूर्ण करत आहेत. ज्यांच्याविरोधात निवडणूका लढवल्या त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. तुमच्या सारखे वेडेवाकडे काम आम्ही केलं नाही. अजित पवार विकासाला साथ देण्यासाठी सोबत आले आहेत, असे टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

तुम्ही तरबेज आहातच; CM शिंदेंसमोरच अजितदादांचे गिरीश महाजनांना शालजोडीतून टोमणे

राज्यातील डबल इंजिनचे सरकार जोरदार काम करत आहे. त्यामुळे विरोधक आरोप करत आहेत. पण त्यांना करु द्या. मी रात्री उशिरापर्यंत काम करतो, अजित पवार सकाळी लवकर उठून काम करतात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा धडाका महाराष्ट्राला माहिती आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Tags

follow us