Eknath Khadse on Mangesh Chavan : जळगाव दूध संघाची नोकर भरती रद्द, एकनाथ खडसेंचा मंगेश चव्हाणांवर हल्लाबोल

Eknath Khadse on Mangesh Chavan : जळगाव दूध संघाची नोकर भरती रद्द, एकनाथ खडसेंचा मंगेश चव्हाणांवर हल्लाबोल

जळगाव : जळगाव दूध संघाची (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh) नोकर भरती रद्द केल्याची घोषणा भाजप आमदार आणि दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) यांनी केली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadase) यांनी निषाणा साधलाय. राजकीय हेतूनं ही कारवाई केल्याचा आरोप खडसे यांनी चव्हाण यांच्यावर केला आहे. एकीकडं बेरोजगारी, बेकारीचं प्रमाण वाढत असताना जे लोक आज नोकरीवर आहेत, त्यांनाच कमी करण्याचा प्रयत्न हा केवळ राजकीय हेतुनं होत असल्याचा आरोप यावेळी एकनाथ खडसे यांनी केलाय.

आमदार खडसे म्हणाले की, या निर्णयामुळं जवळजवळ 100 ते सव्वाशे कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटानं एकनाथ खडसे गटाचा पराभव करुन दूध संघावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर या दूध संघावर आमदार मंगेश चव्हाण यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर आता त्यांनी जळगाव दूध संघाची भरती रद्द केल्याची घोषणा केली. त्याच मुद्द्यावरुन आता एकनाथ खडसे आणि मंगेश चव्हाण एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. खडसेंनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. राजकीय हेतूपोटी ही कारवाई केल्याचं खडसे यांनी म्हटलंय. त्यातील 90 टक्के लोक हे दूध संघामध्ये पाच ते सहा वर्षांपासून नोकरी करताहेत. त्या सर्वांना कायम करण्याचा आमचा प्रयत्न होता असं खडसे यांनी म्हटलंय.

यावेळी एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळावर जोरदार टीका केली आहे. दूध संघावर पाच महिन्यांपासून फक्त आरडाओरड सुरु आहे. तुम्ही काही ठोस निर्णय घेऊन जनतेपुढे मांडून दाखवा असं आव्हान एकनाथ खडसे यांनी दिलंय. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीनंतर खडसे यांनी आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन नवनिर्वाचित दूध संघाच्या संघाच्या संचालक मंडळावर जोरदार टीका केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube