‘सरदार पटेलांनीही संघावर बंदी घातली होती’; ठाकरेंची तोफ भाजप-आरएसएसवर धडाडली

‘सरदार पटेलांनीही संघावर बंदी घातली होती’; ठाकरेंची तोफ भाजप-आरएसएसवर धडाडली

Uddhav Thackeray : राज्याचे माजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज जळगाव दौऱ्यावर आहे. जळगावात पोहोचताच ठाकरेंची तोफ भाजप-आरएसएसवर धडाडली. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देशाचे जळगाव महापालिकेने उभारलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी भाजप-आरएसएसवर घणाघाती टीका केली. आज जळगावात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभाही होणार आहे. या सभेत ठाकरे कुणाला लक्ष्य करणार, याची उत्सुकता आहे.

थोरातांचा इशारा, विखेंचा अ‍ॅक्शन मोड! ‘निळवंडे’च्या पाण्याचे ‘शेड्यूल’च सांगितले

सरदार पटेलांनी आरएसएसवर बंदी घातली

सरदार पटेलांनी त्या काळात आरएसएसवर (RSS) सुद्धा बंदी घातली होती. म्हणजेच त्यांना देशप्रेम काय हे कळत होते. सरदार वल्लभभाई पटेल यांना आरएसएस (Rashtriya Swayansevak Sangh) घातक आहे हे वेळेच्या आधीच समजले होते. म्हणूनच त्यानी संघावर बंदी आणली होती. आता अनेक जाण स्वतःला लोहपुरुष नाव लावून घेत आहेत. पुतळा ज्या उंचीचा आहे ते ठीक आहे. पण, कामाची उंची कधी गाठणार?, असा खोचक सवाल त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी विचारला.

तुम्ही तर तकलादू पुरुष

ते पुढे म्हणाले, आता आपल्याला भारत म्हणावे लागेल कारण, इंडियाचा (INDIA) गवगवा करणाऱ्यांना इंडियाच्या नावाने खाज सुटायला लागली आहे. पटेलांनी अभिमानाने मराठवाडा स्वतंत्र करून घेतला. जशी कारवाई सरदार पटेलांनी मराठवाड्यात केली तशी कारवाई करण्याची हिंमत यांच्यात मणिपुरात दिसली नाही आणि स्वतःला लोहपुरुष म्हणवून घेत आहेत. तुम्ही तकलादू पुरुष आहात अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता केली. केंद्र सरकार आता डगमगायला लागले आहे. केंद्र सरकार हलायला लागले आहे. मला माझ्या महापौर आणि उपमहापौरांसह इतर सहकाऱ्यांचा अभिमान आहे. पोलादी पुरुष केवळ नावाचे नाही तर कामाचे, नाव लावून कुणी काही करू शकेल, अशी खोचक टीका ठाकरे यांनी मोदींवर केली.

पवार मुख्यमंत्री असतांना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही? जगदीश मुळीकांचा सुप्रिया सुळेंना सवाल

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube