लिव्ह इन रिलेशनशिप! पहिला सोडला दुसरा धरला त्यानेच काढला तिचा काटा

  • Written By: Published:
लिव्ह इन रिलेशनशिप! पहिला सोडला दुसरा धरला त्यानेच काढला तिचा काटा

Live in relationship :  प्रेम माणसाला आपलंस करते मात्र याच प्रेमाला तडा गेला तर हेच प्रेम जीवावर देखील उठते. असाच एक धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील शिर्डीमधील एका गावात घडला आहे. एका विवाहितेने आपल्या प्रेम संबंधापायी पती व मुलाला सोडून प्रियकराची साथ दिली. मात्र अखेर प्रियकरानेच त्या विवाहितेला साथ देण्याऐवजी तिचा निरखून खून केला व विशेष म्हणजे स्वतः पोलीस ठाणे गाठत त्याने केल्या या कृत्याची कबुली देखील दिली. सविता सुनिल बत्तीशे (रा. सावळीविहीर) असे मयत महिलेचे तर अजय राजेंद्र म्हस्के असे आरोपीचे नाव आहे. हि घटना शिर्डीमधील साकुरीमध्ये घडली आहे. (Live in relationship! He killed her)

याबाबत अधिक माहिती अशी, मयत सविता या महिलेचे लग्न नाशिक जिल्ह्यातील एकलहरे येथे सुनील माणिक बत्तिशे यांच्या सोबत झाले होते. तिला दोन मुलं देखील होते. दरम्यान तिच्या घराजवळ सावळीविहीर येथे मामाकडे आरोपी अजय राजेंद्र म्हस्के याचे नेहमी येणे जाणे होते. यातून सविता व अजय यांची ओळख झाली व नंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. अजय साठी सविताने आपल्या नवऱ्याला व मुलांना सोडण्याचा निर्णय घेतला. ती अजय सोबत रुईजवळ भोपळे वस्ती येथे राहू लागली.

मात्र ज्या अजयसाठी सविताने आपल्या पतीला सोडले तोच तिचा प्रियकर अजयला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचे होते. या गोष्टीला सविता विरोध करू लागली यामुळे अजय सविताला सतत मारहाण व शिवीगाळ करत होता. याबाबत सविताने शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रारदेखील नोंदवली होती. मात्र रविवारी पुन्हा या दोघांमध्ये वाद झाले व राग अनावर झाल्याने अजयने चाकूने भोसकून सविताचा खून केला. यानंतर आरोपी अजय स्वत: शिर्डी पोलीस ठाण्यात हजर होत आपल्या कृत्याची कबुली त्याने दिली.

विरोधी पक्षनेतेपदासाठी संग्राम थोपटेंनी थोपटले दंड; थेट दिल्लीत लावली फिल्डिंग

दरम्यान या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस पथके तात्काळ घटनास्थळी हजर होत माहिती घेतली. यानंतर सविताचा मृतदेह साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केला असता ती जागेवर मयत झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी कडू किसन आव्हाड (वय ४५, रा. शिर्डी ) यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी अजय राजेंद्र म्हस्के याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube