मोठी बातमी! अहमदनगर शहरात घुसला बिबट्या; हल्ल्यात एक नागरिक जखमी
Ahmednagar News : बिबट्या पाहिला की भीतीने गाळण उडते. पण हाच बिबट्या मानवी वस्तीत शिरून धुमाकूळ घालू लागला आहे. माणसांवर हल्लेही करू लागला आहे. आताही भरदिवसा बिबट्याचा धुमाकूळ आणि एका व्यक्तीवरील हल्ल्याचा थरार केडगावकरांनी याची देही याची डोळा अनुभवला. नगर शहरात बिबट्याचा मानवी वस्तीतील संचार नवीन राहिलेला नाही. जिल्ह्यासह शहरात बिबट्या दिसल्याच्या बातम्या येतात. या बिबट्यांकडून हल्लेही झाले आहेत. आताही पुन्हा नगर शहरातील केडगाव परिसरातील अंबिकानगर भागात बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. केडगावातील अंबिकानगर परिसरात बिबट्या आढळला. या बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केला. मात्र हा व्यक्ती बिबट्याच्या तावडीतून निसटला. परंतु, हा व्यक्ती बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेने केडगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! मनपा आरोग्य अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरवर बिबट्याचा हल्ला, नगरमध्ये खळबळ
आज दुपारी हा बिबट्या अंबिकानगर भागात काही लोकांना दिसला. लागलीच ही बातमी सगळीकडे पसरली. बिबट्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली. या घटनेची माहिती लोकांनी वनविभागाला दिली. यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने उपाययोना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
याआधीही अहमदनगर शहरालगत असणाऱ्या चांदबीबी महाल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलं होतं. अनेकांनी चांदबीबी महाल परिसरात बिबट्या पाहिलाही होता. त्यानंतर आता नगर शहरातच बिबट्याने प्रवेश केल्याने वन विभाग आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे.
सावधान! बिबट्या येतोय, वनविभाग झाला सतर्क; नागरिकांना महत्वाचं आवाहन
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून शहरात बिबट्याचा वावर आहे. भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात तो मानवी वस्तीत आला आहे. सावेडी भागात हा बिबट्या असल्याचे सांगण्यात येत होते. नगर तालुक्यातील सोनेवाडी भागात बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन महिन्यांपूर्वी धर्माधिकारी मळ्यातही बिबट्याचे दर्शन झाले होते.