‘एमआयडीसी’च्या पत्राचा वाद चिघळला! शिंदेंनी अजितदादांचं नाव घेत रोहित पवारांना सुनावलं

‘एमआयडीसी’च्या पत्राचा वाद चिघळला! शिंदेंनी अजितदादांचं नाव घेत रोहित पवारांना सुनावलं

Ram Shinde vs Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात एमआयडीसी आणि कर्जत एसटी डेपोच्या मुद्द्यावर सुरू झालेला आणखीच चिघळला आहे. याला कारण ठरले ते रोहित पवार यांनी पीएम मोदींना धाडलेले पत्र. या पत्रामुळे दोघांत नवा वाद सुरू झाला. आमदार राम शिंदे यांनीही आक्रमक होत आमदार पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

राम शिंदे यांनी आज नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. रोहित पवार यांनी नौटंकी बंद केली पाहिजे. 2019 मध्ये माझ्या घराचा खूप मोठा इश्यू केला. महाराष्ट्रात माझं घर गाजलं. दोन हजार स्क्वेअर फुटात घरं बांधलं. आता यांनी तर दोन एकरात घर बांधलंय. अर्ध्या एकरात बांधकाम आहे. याची सुद्धा चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी शिंदे यांनी केली.

काय भाषणं करायचे? पण मंत्रीपद अन् ‘हरहर मोदी’…; संदीप क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

कर्जतमध्ये एमआयडीसी व्हावी हा मुद्दा आ. पवार यांनी उचलून धरला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर आता तर त्यांनी थेट पीएम मोदींनाच पत्र लिहीले आहे. त्यामुळे शिंदेही चांगलेच चिडले आहेत. रोहित पवार ज्या एमआयडीसीसाठी प्रयत्न करत आहेत. ती जागा नीरव मोदीची आहे. त्या जमिनीचा हिडन पार्टनर कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे, असा टोला शिंदेंनी लगावला.

पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले. पुण्यात मोदींच्या कार्यक्रमावेळी फलक झळकावले. एमआयडीसी हा काय केंद्र सरकारचा प्रश्न आहे का. शरद पवारही पु्ण्यातील कार्यक्रमात उपस्थित होते. मोदींच्या शेजारीच बसले होते. मग त्यांच्याच हातात एखादं निवेदन किंवा पत्र का दिले नाही असा खोचक सवाल शिंदे यांनी केला. ही नौटंकी त्यांनी बंद केली पाहिजे उद्या तुम्ही एमआयडीसीसाठी जो बायडन यांनाही पत्र लिहाल. त्यामुळे एवढ्या लांब पत्र पाठवण्यापेक्षा घरच्या घरी अजितदादांच्या उशाला पत्र ठेवलं असतं तरी अजितदादांनी वाचलं असतं.

माझा नातू मोठे उद्योग उभारेल

ते म्हणतात मी खूप मोठे धंदे करतो. आता तुमचे आजोबा चार वेळेस मुख्यमंत्री. तुमचे चुलते पाच वेळेस उपमुख्यमंत्री. आता आमच्या बापानं सालं घातली. मी आमदार झालोय, मंत्री झालोय. माझा नातू मोठ मोठे उद्योग उभारेल ना. तरी ते तुमचे चुलत आजोबा आणि चुलत चुलते आहेत. माझा सख्खा नातू हे उद्योग पुढील काळात उभारेल.

पालकमंत्रीपदावरून दोन दादांमध्ये समेट?; ध्वजारोहणासाठी अजितदादा कोल्हापुरात जाणार

राम शिंदेच्या नावावर एकरभराचा उतारा काढूनच दाखवा

मी चॅलेंज केलं होतं माझी एकही गुंठा जमीन कर्जतमध्ये नाही. आता या प्रश्नाचं उत्तर कुणी द्यायचं. तुम्ही तीन वर्षात किती गुंठे, किती एकर अन् किती जमा केले हे सांगायला पाहिजे की नाही. गोरगरीबांच्या मागासवर्गीयांच्या सोसायट्यांवर सरकारचा शिक्का लागला, कशासाठी लागला हे त्यांनी सांगायला पाहिजे की नाही. राम शिंदेच्या नावावर एकरभराचा उतारा काढून दाखवा. नाही केलं आम्ही. तुम्ही इतक्या लवकर हे सगळं कसं केलं हे त्यांनी सांगायला पाहिजे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube