मोठी बातमी! माजी आमदार मनिष जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीचे छापे
Ed Raid in Jalgaon : राज्यात सध्या ईडीच्या कारवाया वाढल्या असून राजकीय नेत्यांनी याचा धसकाच घेतला आहे. आता अशीच मोठी जळगावातून येत आहे. माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमुळे जळगावात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासूनच ही कारवाई सुरू आहे. स्टेट बँकेकडून घेण्यात आलेल्या थकीत कर्जाच्या संदर्भात ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्व्हे कशाला, महाविकास आघाडीच फुटणार; निवडणुकांआधीच शिरसाटांनी उडविली खळबळ!
याबाबत अधिक माहिती अशी, ईडी पथकाच्या दहा गाड्या एकाच वेळी जळगावात दाखल झाल्या. माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या जळगावसह नाशिकमधील मालकीच्या एकूण सहा संस्थांवर ही छापेमारी करण्यात आली. या ठिकाण जी काही मालमत्ता आणि कागदपत्रे सापडली ती ताब्यात घेऊन त्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीतून काय समोर आले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या कारवाईमुळे सराफा पेढ्यांचं आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
ईडीच्या छाप्यांचं कारण काय?
काल आणि आज दिवसभर शहरात या कारवाईचीच जोरदार चर्चा सुरू आहे. शहरात पहिल्यांदाच ईडीचे पथक दाखल झाले आहे. आज सकाळी सुद्धा ईडीची कारवाई सुरूच होती. स्टेट बँकेकडून घेतलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या थकीत कर्जासंदर्भात ही कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या कारवाईत ईडीच्या एकूण 60 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती आहे. मागील वर्षी सीबीआयने राजमल लखीचंद ज्वेलर्सची चौकशी केली होती. त्यानंतर यावर्षी तर ईडीचेच पथक येऊन धडकले आहे.