पवारसाहेब की अजितदादा? अहिरे म्हणाल्या, मी सही केली पण…

पवारसाहेब की अजितदादा? अहिरे म्हणाल्या, मी सही केली पण…

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीनंतर पक्षातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड गोंधळात सापडले आहेत. अजित पवार यांच्या गटात जावे की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाच पाठिंबा द्यावा याचा निर्णय अनेक आमदारांना अजूनही घेता आलेला नाही. आमदारांची द्विधा मनस्थिती झाली आहे.

आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनीही असेच मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, पक्षातील नवीन आमदारांची मोठी अडचण झाली आहे. अजितदादा आणि साहेब यांच्यात निवडणे अवघड आहे. आमच्या सारख्या आमदारांची अडचण होत आहे. माझ्या काही कामासाठी मी देवगिरीवर गेले होते. म्हणून मी सही केली आणि त्यानंतर शपथविधीच्या कार्यक्रमाला गेले होते.

जयंत पाटीलही आक्रमक मोडमध्ये, काढली अजितदादांची लाज

सुप्रिया सुळे यांच्याबरोबर माझी चर्चा झाली आहे. पवार साहेबांशीही मी चर्चा केली. चार तारखेला माझी सर्जरी होती. माझं बाळ लहान म्हणून मी आले. आमच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास म्हणून मी सही केली. इतर आमदारांनी पण सही केली. जनतेच्या मतावर मी आमदार त्यामुळे आता पुढे काही निर्णय घेण्याअगोदर मतदारांचा कौल घेणार आहे.

मी सही केली म्हणून माझा पाठिंबा त्यांनी गृहीत धरला. आमचे असे क्षेत्र त्यात चर्चा होणारच. काही लोक असमाधानी म्हणून त्यांनी तक्रार केली असेल, असेही अहिरे यांनी सांगितले.

येवला येथे शरद पवार यांची सभा होणार आहे त्यावर अहिरे म्हणाल्या, येवल्यात होणाऱ्या सभेत मी बरे वाटले तर जाईल. काही कामांना स्थगिती होती. मुख्यमंत्र्यांना विनंती केल्यानंतर या कामांवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. यानंतर आता कोणत्या गटात जायचे याचा निर्णय मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करुनच घेणार असल्याचे अहिरे म्हणाल्या.

पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरेही मैदानात; थेट कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांच्या दारावर जाऊन साधणार संवाद

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube