‘बाळासाहेबांनी मला मोठं केलं तर, शरद पवार माझ्यासाठी’.. संजय राऊतांचे गौरवोद्गार
Sanjay Raut : कर्जत (जि. अहमदनगर) येथे आज मराठी पत्रकार परिषदेचा मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला ठाकरे गटाचे खसदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हजेरी लावली. यावेळी राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी आमदार रोहित पवार उपस्थित होते.
राजकीय टीकेनंतर ‘वर्षा’ अन् ‘सागर’ बंगल्यावरील खर्चावर मर्यादा…
राज्य विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालांनंतर संजय राऊत अचानक शरद पवारांना भेटायला गेले असा दावा अनेक माध्यमांनी केला होता. त्यावर राऊत म्हणाले, ‘आम्हाला रात्रीच्या अंधारात भेटण्याची काहीच गरज नाही.’
ते पुढे म्हणाले, ‘मी माझ्या आयुष्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याइतकेच शरद पवार यांनाही स्थान देतो. मला बाळासाहेबांनी मोठं केलं, मला या क्षेत्रात उभं केलं. पण शरद पवार सुद्धा माझ्यासाठी आधारस्तंभ आहेत. तुम्हे जे म्हणत आहात तशा भेटीगाठी पवार कधीच घेत नाहीत.’ त्या दिवसाची आठवण सांगताना राऊत पुढे म्हणाले, ‘मी त्या दिवशी शिवसेना भवनात होतो. उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पाहिली आणि त्यानंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो.’
खात्यात पैसे नाही तरी UPI द्वारे पेमेंट होणार…जाणून घ्या कसे काय
त्यावेळी तेथे पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारले की कशासाठी आला आहात. मी म्हणालो, सत्तास्थापनेसाठी आलो आहे. सरकार बनवायला आलो आहे. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सांगितले होते की आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत.