Maratha reservation agitation : आंदोलन पेटलं! जिल्ह्यात बससेवा पूर्णतः ठप्प… प्रवाश्यांचे हाल

Maratha reservation agitation : आंदोलन पेटलं! जिल्ह्यात बससेवा पूर्णतः ठप्प… प्रवाश्यांचे हाल

Maratha reservation agitation : अहमदनगर मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation agitation) मुद्द्यावरून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु होते. मात्र या उपोषणस्थळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आता याचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून याची झळ नगर जिल्ह्यात देखील बसू लागली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाकडून बस जाळण्यात आल्या. या प्रकारामुळे प्रवाश्यांच्या सुरक्षेतेच्या कारणास्तव व वित्तहानी टाळण्यासाठी नगर जिल्ह्यातील बससेवा पूर्णतः ठप्प ठेवण्यात आली आहे. मात्र अचानक बससेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाश्यांचे मोठे हाल होऊ लागले आहे.

Ahmednagar Crime : महसूलच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; मध्यप्रदेशातून चौघे ताब्यात

अहमदनगर जिल्ह्यात बससेवा बंद

मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation agitation) मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात गेल्या चार दिवसापांसून उपोषण सुरु होते. मात्र, शुक्रवारी (01 सप्टेंबर) पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर दगडफेक आणि लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे वातावरण चिघळले गेले व त्यानंतर संतप्त जमावाने बस जाळल्या. दरम्यान तब्बल 25 बस जाळण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खबरदारीची भूमिका म्हणून नगर जिल्ह्यात बससेवा बंद करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार बससेवा बंद करण्यात आली असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली आहे.

Ahmednagar : सावेडी बसस्थानक कात टाकणार; पुनर्बांधणीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर

एका दिवसात महामंडळाचे 65 लाखांचे नुकसान

जालन्यात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर (Maratha reservation agitation) अनेक ठिकाणी बससेवा बंद करण्यात आली आहे. याच पार्शवभूमीवर नगर जिल्ह्यात बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान नगर जिल्ह्यातील 11 डेपोमध्ये तब्बल 635 बस या दररोज प्रवास करत असतात. आज सकाळी काही डेपोंमधून बससेवा सुरु होती, मात्र पोलीस प्रशासनाचा आदेश आल्यानंतर त्याही बस स्थानकात परत बोलवून घेण्यात आल्या आहेत. दरम्यान बससेवा ठप्प झाल्याने एका दिवसाला जिल्ह्यातील परिवहन महामंडळाचे तब्बल 65 लाखांचे नुकसान हे होत असते अशी माहिती सपकाळ यांनी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube