मुस्लिमांची मतं चालतात, नेतृत्व नको; इम्तियाज जलील यांचा ‘मविआ’वर घणाघात

मुस्लिमांची मतं चालतात, नेतृत्व नको; इम्तियाज जलील यांचा ‘मविआ’वर घणाघात

MP Imtiaz Jalil On Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपली दुटप्पी भूमिका बंद करावी. एमआयएमला (MIM)भाजपची (BJP) बी टीम म्हणण्यापेक्षा एकदा आम्हाला सोबत येण्याची संधी तर देऊन पाहा, मात्र तसं होत नाही. त्यांना मुस्लिमांची मतं हवी आहेत मात्र नेतृत्व नको आहेत. धर्मनिरपेक्ष नेते म्हणून शरद पवार (Sharad Pawar), राहुल गांधी (Rahul Gandhi) चालतील पण ओवैसी (Asaduddin Owaisi) नेते म्हणून नको आहेत, त्यांची मतं मात्र हवी आहेत, असं कसं चालेल? ही दुटप्पी भूमिका थांबवण्याची गरज असल्याची टीका छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil)केली आहे. ते आज अहमदनगर (Ahmednagar)दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कर्नाटकपेक्षाही महाराष्ट्राचे सरकार हे भ्रष्टाचारी, पटोलेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

महाविकास आघाडीला वाटत असेल की, एमआयएममध्ये काही तरी ताकद आहे, तर त्यांनी ऑफर द्यावी, आम्ही सोबत यायला तयार आहोत. काय अटी शर्ती ठरवायच्या त्या एकत्र बसून ठरवू असेही यावेळी खासदार जलील म्हणाले.

भाजपविषयी खासदार जलील म्हणाले की, भाजपला हरविण्यासाठी जे काही बलिदान देण्याची गरज आहे, ते द्यायला आम्ही तयार आहोत. भाजपने जाती-धर्माच्या नावाखाली फूट पाडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते की, आता आपण कायमस्वरुपी पंतप्रधान राहू, मात्र न्यूटनचा नियम आहे की, जी वस्तू वर जाते ती कधी ना कधी खाली येतेच. तसे मोदीही एक दिवस खाली येणारच आहेत. मात्र तोपर्यंत देशातील वातावरण खराब झालेले असेल. त्यामुळे भाजपच्या विरोधात एकत्रित लढा देण्याची गरज आहे, असेही आम्हाला वाटते, असेही जलील म्हणाले.

यावेळी खासदार जलील यांनी कालीचरण महाराज यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले की, भगवे कपडे घातले म्हणून कोणीही साधू होत नाही. अनेकदा गुन्हेगारही भगवे कपडे घालून फिरताना दिसतात. त्यातील काहींना स्वामी, महाराज म्हणायला सुरुवात झाली आहे. ज्यांना पाहून आपल्याला आदर वाटेल त्यांनाच महाराज म्हणावे. मात्र आसाराम बापू, कालीचरण यांची ही अवस्था आहे. त्यांची जागा तुरुंगातच आहे. मात्र जेव्हा पोलीस राजकीय दबाव झूगारुन काम करतील तेव्हा असे दहा कालीचरण आले तरी काही फरक पडणार नाही असेही यावेळी खासदार जलील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube