तुमच्याकडं गडगंज संपत्ती, पण माझ्याकडे कोहिनूर माणसं; निलेश लंकेंनी निवडून येताच डिवचलं!

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीत खासदार निलेश लंके यांनी बाजी मारल्यानंतर विरोधकांना इशारा देत मतदारांचे आभार मानले आहेत.

Nilesh Lanke

MP Nilesh Lanke : तुमच्याकडे गडगंज संपत्ती पण माझ्याकडे पैशाने विकत न घेऊ शकणारी कोहिनूर माणसे असल्याचं विरोधकांना डिवचंत खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke ) यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पारनेर विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी पहिल्याच प्रतिक्रियेत राजकीय विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जिल्हा बँकांच्या निवडणुकीत काही जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी मात्र, काही जागांसाठी मतदान पार पडले आहे. त्यानंतर आज मतमोजणी होत असून निकालाचे कौल येण्यास सुरुवात जाहली आहे. अशातच, अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक मतमोजणी सुरू झाली असून पहिला निकाल समोर आला आहे. पहिला निकाल हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्या बाजूने लागला असून त्यांचा यात दणदणीत विजय झाला आहे. निलेश लंके यांनी पारनेर विविध सेवा सोसायटी गटात भाजपचे राहुल शिंदे यांचा पराभव केला.

पारनेर विविध सेवा सोसायटी मतदारसंघात खासदार निलेश लंके विजयी. झाले आहे. 104 मतापैकी निलेश लंके यांना 63 मते मिळाली आहे. तर भाजपचे राहुल शिंदे यांचा यात पराभव झाला आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 10 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. एकूण 3,837 मतदारांपैकी 3,809 जणांनी मतदान केले. सोसायटीच्या चारही मतदारसंघांत 100 टक्के मतदान झाले. यात विखे-थोरात यांच्या सहकार आघाडी आणि नीलेश लंके- सदाशिव लोखंडे यांच्या परिवर्तन आघाडीत चुरशीची लढत होती

दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी 99.27 टक्के एवढे मतदान झालं होतं. यापूर्वी 21 पैकी 11 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. तर 10 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आज मतमोजणी सुरू आहे.

follow us