Sujay Vikhe patil : काँग्रेसमधला शेवटचा तरुण म्हणजे.., खासदार सुजय विखेंची राहुल गांधींवर खोचक टीका

Sujay Vikhe patil : काँग्रेसमधला शेवटचा तरुण म्हणजे.., खासदार सुजय विखेंची राहुल गांधींवर खोचक टीका

अहमदनगर : काँग्रेसमधला शेवटचा तरुण म्हणजे राहुल गांधी असल्याची खोचक टीका नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील(sujayvikhepatil) यांनी केलीय. यावेळी त्यांनी राहुल गांधी (rahulgandhi) यांच्यासह काँग्रेस (Congress) पक्षावर सडकून टीका केलीय. ते अहमदनगर शहरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

विखे पुढे बोलताना म्हणाले, मी काँग्रेस पक्षामध्ये असताना पाहिलंय की, काँग्रेसचे नेते आपली आपली खूर्ची सांभाळण्यात व्यस्त आहेत. त्यांना पक्षाचं काही देणं घेण नाही. हे काँग्रेसचं दुर्देव असल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलंय.

तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी एवढ्या वर्षे सत्ता भोगूनही त्यांनी पक्षाला वाढविण्यासाठी कोणत्याही प्रकारचं योगदान दिलं नसल्याचं म्हंटलंय. काँग्रेसच्या नेत्यांनी फक्त आपला आपला प्रपंच वाढवण्याकडेचं लक्ष दिल्याची टीकाही त्यांनी केलीय.

सध्या काँग्रेसमधून अनेक बाहेर पडताना दिसून येत आहेत. ज्योतिरादित्य शिंदे (jyotiradityashinde) , यांच्यासह सचिन पायलट(sachinpailot) सारखे नेते काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. याचं कारण म्हणजे ज्येष्ठ नेत्यांनी नव्या युवकांना पक्षात येण्यापासून नाकारलं आहे.

त्यांच्या या कारणामुळेच मीदेखील काँग्रेसमधून बाहेर पडलो आहे. असच एक एक करत अनेक नेते काँग्रेसमधून बाहेर पडणार असून काँग्रेसमध्ये शेवट एकच तरुण राहणार असून तो तरुण म्हणजे पक्ष अध्यक्ष राहुल गांधी असतील. ज्येष्ठ नागरिकांचा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख राहील, असं विधान सुजय विखे यांनी केलंय.

दरम्यान, अनेकदा विखे कुटुंबातील सदस्यांकडून काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात. त्यांच्या टीक-टीपणीमुळे ते कायम चर्चेत असतात. आता नुकतीच सुजय विखे यांनी केलेल्या या टीकेवर काँग्रेसचे नेते काय प्रत्युत्तर देतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube