महिला शिक्षणाधिकाऱ्याच्या घरी सापडलं मोठं घबाड; 85 लाखांची रोकड, 32 तोळे सोने अन्…

महिला शिक्षणाधिकाऱ्याच्या घरी सापडलं मोठं घबाड; 85 लाखांची रोकड, 32 तोळे सोने अन्…

Nashik Crime : नाशिकमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या महापालिका शिक्षण अधिकारी (Municipal Education Officer)सुनीता धनगर (Sunita Dhangar)यांना अटक केली. त्यानंतर पथकाने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. त्यामध्ये मोठं घबाड पथकाच्या हाती सापडलं आहे. ही जमवलेली माया पाहून त्या ठिकाणी असलेले अधिकारी एकदम अवाक् झाले.

Letsupp Special : रेल्वे अपघाताचे ‘वंदे भारत’ कनेक्शन; मालगाड्यांचे प्रमाण अन् वाढती ठेकेदारीही मुळाशी?

एसीबीने शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. त्यानंतर एसीबीनं त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. त्यात तब्बल 85 लाख रुपयांची रोकड आणि 32 तोळे सोने असं मोठं घबाड पथकाच्या हाती लागलं आहे.

त्याचवेळी शिक्षणाधिकारी धनगर यांच्या नावावर दोन फ्लॅट आणि एक प्लॉट असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

नाशिक महापालिकेत शिक्षणाधिकारी म्हणून काम करणाऱ्या सुनीता धनगर आणि लिपिक नितीन जोशी या दोघांना एसीबीने लाच घेताना अटक करण्यात आली होती. 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने त्यांना रंगेहात पकडले आहे.

यामध्ये तक्रारदार हे मुख्याध्यापक आहेत, त्यांना एका प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलेले होते. कामावर रुजू करण्यासाठी लिपिक जोशी यांनी पाच हजार तर शिक्षणाधीकारी सुनीता धनगर यांनी 45 हजार रुपये घेत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्यात मोठी माया हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube