अखेर रोहित पवार झाले ‘कर्जत’कर; सोशल मीडियावरुन राम शिंदे अन् विखे पिता-पुत्रांना ‘वास्तूशांती’ चे आमंत्रण

कर्जत : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) अखेर कर्जतचे रहिवासी झाले आहेत. कर्जतमधील त्यांचे निवासस्थान आणि ऑफिसचे बांधकाम पूर्ण झाले असून याची मंगळवार (13 जून) रोजी पूजा ठेवण्यात आली आहे. दरम्यान, त्यांनी या पूजेसाठी विधानपरिषदेचे आमदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी राम शिंदे यांना जाहीर निमंत्रण दिले आहे. याशिवाय अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनाही निमंत्रण दिले आहे. (NCP MLA Rohit Pawar invite to BJP Leader Ram Shinde, Radhakrishan Vikhe Patil and Sujay Vikhe Patil for Vastu Shanti)
2019 च्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रचारादरम्यान, रोहित पवार यांच्यावर बाहेरचा उमेदवार म्हणून बरीच टीका झाली होती. राम शिंदे आणि अन्य भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जाहीरपणे ही टीका केली होती. ही टीका खोडून काढण्याठी निकालानंतर रोहित पवार यांनी अधिकृतपणे कर्जत शहराचे रहिवासी होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कर्जत शहातील कुळधरण रस्ता इथे घर आणि कार्यालयाचे बांधकाम सुरु केले.
सस्नेह निमंत्रण
मा. राधाकृष्ण विखे-पाटील साहेब
पालकमंत्री.नमस्कार!
कर्जतमध्ये बांधलेलं 'दिनकर' हे निवासस्थान आणि ऑफिस या वास्तूची उद्या (मंगळवार दि. १३ जून) सकाळी ९ ते दुपारी १२ यादरम्यान पूजा ठेवण्यात आली आहे. या पूजेच्या निमित्ताने आपण तिर्थप्रसादासाठी उपस्थित राहून माझ्या… pic.twitter.com/Oid2xUir7A— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2023
अखेर आता हे बांधकाम पूर्ण झाले असून रोहित पवार यांनी ‘वास्तू पूजा’ आयोजित केली आहे. याचेच निमंत्रण त्यांनी जाहीरपणे आमदार राम शिंदे आणि विखे पिता-पुत्रांना ट्विट करत दिले आहे. त्यांच्या या खोचक ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
सस्नेह निमंत्रण
मा. प्रा. राम शिंदे साहेब
आमदार, विधानपरिषद.नमस्कार!
कर्जतमध्ये बांधलेलं 'दिनकर' हे निवासस्थान आणि ऑफिस या वास्तूची उद्या (मंगळवार दि. १३ जून) सकाळी ९ ते दुपारी १२ यादरम्यान पूजा ठेवण्यात आली आहे. या पूजेच्या निमित्ताने आपण तिर्थप्रसादासाठी उपस्थित राहून… pic.twitter.com/lp34CshB4Z— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2023
रोहित पवार यांनी निमंत्रणात काय म्हटलं आहे?
मा. प्रा. राम शिंदे साहेब आमदार, विधानपरिषद
मा. सुजय जी विखे-पाटील खासदार
मा. राधाकृष्ण विखे-पाटील साहेब पालकमंत्री,
कर्जतमध्ये बांधलेलं ‘दिनकर’ हे निवासस्थान आणि ऑफिस या वास्तूची उद्या (मंगळवार दि. १३ जून) सकाळी ९ ते दुपारी १२ यादरम्यान पूजा ठेवण्यात आली आहे. या पूजेच्या निमित्ताने आपण तिर्थप्रसादासाठी उपस्थित राहून माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी व्हावं, ही नम्र विनंती!
दरम्यान, आता रोहित पवार यांच्या या निमंत्रणाचा स्वीकार करुन आमदार शिंदे आणि विखे पिता-पुत्र वास्तूशांती जाणार का याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.