Ahmednagar News : छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान… ‘पारनेर बंद’

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 06 12 At 11.42.44 AM

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पाबळ येथील एका तरुणाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याची घटना समोर आली आहे. यावरून पारनेर तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून पारनेर पोलीस स्टेशन मध्ये संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ हिंदूवादी संघटनेकडून आज पारनेर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Offensive statement about Chhatrapati Shivraya in Parner)

दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून आज संपूर्ण पारनेर तालुक्यात नागरिकांनी तसेच व्यावसायिक व्यापारी यांनी बंदला प्रतिसाद दिला आहे. बाजारपेठा कडकडीत बंद असल्याने सकाळपासूनच सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला आहे. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात फिर्याद संदीप चंद्रकांत कावरे यांनी दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान उगले करत आहेत.

Kolhapur News : कागलमध्ये आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास अटक, चौकांमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात…

पोलीस यंत्रणा सतर्क 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिक तेढ निर्माण होईल अशा घटना घडू लागल्या आहेत. नुकतेच औरंगजेबाच्या पोस्टर वादावरून भिंगारमध्ये बंद पाळण्यात आला होता. तर आता पारनेरमध्ये छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याच्या विषयावरून वाद पेटला आहे. राज्यातील विविध शहरात सुरु असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पारनेर पोलीस सतर्क झाले आहे. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असा कोणताही मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित करु नये, असे आवाहन पारनेर पोलिसांनी केले आहे.

Tags

follow us