बाजार समितीत राजळे-ढाकणे गटात टफ ‘फाईट’; घुलेंची काय खेळी असणार?
Pathardi Election : पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आमदार मोनिका राजळे व अॅड प्रताप ढाकणे या दोन्ही नेत्यांची ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तालुक्यातील कोणतीही निवडणूक असो जातीपातीची गणिती जुळविण्यात यशस्वी ठरविणाऱ्या गटाची सरशी होत असल्याने आगामी बाजार समिती निवडणुकीत ढाकणे राजळे गट कशा पद्धतीने उमेदवार उभे करतो यावरच कोण बाजी मारणार हे ठरेल.
मागील बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय मोहनराव पालवे, अनिल कराळे यांच्या सहकार्यामुळे ढाकणे यांचे पारडे जड होते. तर काही विद्यमान संचालक बाजूला गेले आहे.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अॅड प्रताप ढाकणे यांचा चांगला कस लागणार जाणार आहे. गेल्या काही वर्षापासुन सर्व सत्ता स्थाने राजळे गटाकडे असताना गेल्या बाजार समितीच्या निवडणूकीत उमेदवार निवडीत ढाकणे गटाने सहकारात प्राबल्य असणाऱ्या मराठा उमेदरांना झुकते माप दिल्याने अनपेक्षित राजळे गटाची सत्ता उलथून बाजार समिती ताब्यात घेतली होती.
त्या निवडणुकीत राजकीय चाणक्ष अशी ओळख असणारे राजीव राजळे आजारी असल्याने उमेदवार निवडीत त्यांचा फारसा सहभाग नव्हता असे जाणकार म्हणतात. मागील निवडणुकीत झालेली चूक सुधारून राजळे गट मराठा उमेदरांना झुकते मापे देणार की भाजपाचा पारंपरिक मतदार असणाऱ्या वंजारी समाजाला झुकत मापं देणार या वर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.
आमदार मोनिका राजळे यांना बाजार समितीची निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात शुभेच्छुक उमेदवारांची मनधरणी करून संचालक जास्त कसे निवडून येतील त्यासाठी अर्ज दाखल केलेल्या इच्छुक उमेदवारी पैकी निवडून येणाऱ्या उमेदवाराला जातीय बेरीज धरूनच राजकारण करावे लागणार आहे. मागील पंचवार्षिकच्या निवडणुकीत राजीव राजळे हे होते, आता राजळे नसल्याने पूर्ण निवडणुकीचा भार आमदार मोनिका राजळे यांच्या खांद्यावर आहे. मागील निवडणुकीमध्ये उमेदवार देण्यामध्ये राजळे गटाचा पूर्ण फॉर्मुला चुकीचा ठरल्याने विरोधकांनी ही निवडणूक काबीज केली होती. या निवडणुकीसाठी आमदार मोनिका राजळे कशा पद्धतीने संचालकांच्या निवडीसाठी आपल्या पॅनलकडून उमेदवारी देतात कसा निकष लावले जाते ते ठरणार आहे.
Chandrasekhar Bawankule : ‘निकाल विरोधात गेला तरी आमच्याकडे 184 चा आकडा’
मागच्या पंचवार्षिकच्या निवडणुकीत अॅड प्रताप ढाकणे उमेदवारी देताना मराठा समाजाला प्राधान्य देत संचालक पदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरलेले होते. आता तशीच काहीशी व्युहरचना आमदार मोनिका राजळे करणार की काय?असा प्रश्न उपस्थित झाला असून तसे झाल्यास या निवडणुकीत एकास एक तोडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसतील. परिणामी ही निवडणूक अटीतटीची होऊन प्रतिष्ठेची बनली जाईल.दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून आम्हीच निवडणूक जिंकणार असा दावा केला जात असला तरी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता निवडणुक तेवढी सोपी राहिली नाही. मतदाराची मानसिकता याचा कल पाहिला तर तो कोणत्या पॅनलकडे झुकेल हे अंतिम उमेदवार फायनल झाल्यानंतर स्पष्ट होईल.
Sanjay Dutt Injured: ‘केडी-द डेव्हिल’च्या शूटिंगदरम्यान संजय दत्तला गंभीर दुखापत, हात-चेहऱ्यावर जखम
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत चेअरमनपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेत विरोध केला. आगामी निवडणुकीत सक्रिय होण्याचे संकेत दिले. त्याचा फटका या निवडणुकीत आमदार राजळे यांना होतो की काय हे पाहणे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले असून 20 एप्रिल अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित होणार आहे. मात्र राजळे ढाकणे हे दोन्हीही नेते निवडणुकीच्या प्रचाराला कामाला लागले असून प्रचाराची सुरुवात हि गावो गावी जाऊन मतदार कार्यकर्ते ग्रामस्थ यांच्या बैठका भेटी घेऊन सुरू केल्या आहेत.