पुणे-अहिल्यानगर प्रवासात 45 मिनिटे वाचणार; देशातील सर्वात लांब उन्नत मार्गाचा विकास…
\पुणे-शिरूर महामार्गाच्या विस्ताराला मिळाली असून पुणे-अहिल्यानगर NH 753F मार्गावर 35 किलोमीटरचा सहा पदरी उन्नत मार्ग उभारला जाणार आहे.
Ahilyanagar-Pune Highway : पुणे-शिरूर मार्गाचा विस्तार होणार असून या मार्गाचे सहा पदरी उन्नत मार्गामध्ये रुपांतर होणार आहे. हा देशातील सर्वात लांब उन्नत मार्ग ठरणार आहे. शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या मार्गांपैकी एक मार्ग हा असून प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या महामार्गामुळे पुणे-अहिल्यानगर (Ahilyanagar-Pune Highway ) प्रवासात 45 मिनिटे वाचणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगरकरांसह इतर प्रवाशांना या महामार्गाचा चांगलाच फायदा होणार आहे.
पूर्वी एक झोप झाली की, मिळायचा ‘हाफ टाईम’ मग, आपण झोपेच्या 8 तासांच्या चक्रात कसे अडकलो?
राज्य सरकारने पुणे-शिरूर महामार्गाच्या विस्ताराला मंजुरी दिली असून पुणे-अहिल्यानगर NH 753F मार्गावर 35 किलोमीटरचा सहा पदरी उन्नत मार्ग उभारला जाणार आहे. पुणे, शिरूर, वाघोली, शिक्रापूर आणि लोणीकांड परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 53.4 किलोमीटरच्या या महामार्गासाठी सुमारे 7,300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून काम पूर्ण होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे.
NEET Exam Paper leak : आता पेपर फुटूच शकत नाही…प्रश्नपत्रिकेच्या संरक्षणाची जबाबदारी सैन्याकडे?
या प्रकल्पामुळे पुणे ते शिरूर प्रवास केवळ 45 मिनिटांत होणार असून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील प्रवाशांनाही मोठा फायदा मिळणार आहे. तसेच समृद्धी महामार्गाशी कनेक्टिव्हिटी वाढून वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे-शिरूर मार्ग , पुणे-अहिल्यानगर NH 753F महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे या मार्गाच्या विकासामुळे छत्रपती संभाजनगर आणि मराठवाड्यापर्यंत अंतर कमी होणार आहे. यासह समृद्धी महामार्गालाही थेट जोडणारा मार्ग तयार होणार आहे. येरवडा, खराडी, वाघोली, लोणीकांड, शिक्रापूर आणि शिरूर परिसरांमधील मार्गावरील कोंडी फुटणार आहे.
पुण्याच्या आंदेकर टोळीतील पाच जणांना अहिल्यानगरमधून अटक, 4 पिस्टल अन् 10 जिवंत काडतुसे जप्त
या मार्गाच्या विस्तारासाठी 80 टक्के जमीन MSIDCच्या ताब्यात असल्यामुळे काम सुरू करण्यासाठी विलंब होणार नाही. काम सुरू करताच 4 वर्षांत हा मार्ग तयार होणार असल्याची शक्यता आहे. या मार्गामुळे पश्चिम आणि पूर्व महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. पुण्याहून मराठवाड्यातील प्रवास सुलभ होणार आहे.