आमची त्यांना अडचण, ‘गणेश’ च्या निवडणुकीतील पराभवानंतर विखे म्हणाले…

  • Written By: Published:
आमची त्यांना अडचण, ‘गणेश’ च्या निवडणुकीतील पराभवानंतर विखे म्हणाले…

Radhakrishna Vikhe Speak On Ganesh Factory : गणेश कारखाना भाडेतत्वावर घेतलेल्या कराराची मुदत संपली असली तरी, कराराची मुदत वाढवण्याचा विखे पाटील कारखान्याचा अधिकार होता. मात्र गणेशच्या सभासदांचा कौल मान्य करून, नवनिर्वाचीत संचालक मंडळाने कारखाना चालवावा आमच्या करारची कोणतीही अडचण त्यांना येणार नाही. गणेश कारखान्या करीता सहकार्याचीच भूमिका राहील असे स्पष्ट मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. गणेश कारखाना निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच शिर्डी येथ पत्रकारांशी बोलतांना मंत्री विखे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर उपस्थित होते. (Radhakrishna Vikhe Speak On Ganesh Factory)

विखेंना धक्का देत ‘गणेश’ वर थोरात -कोल्हेंची सत्ता

राहाता तालुक्यातील आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या मतदारसंघातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या पॅनलने विखेंना पराभवाची धूळ चारली. विखे-पाटील यांच्या जनसेवा मंडळ पॅनलचाअत्यंत दारुण पराभव झाला. या निवडणुकीत थोरात-कोल्हे गटाने 19 पैकी 18 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

दरम्यान या निवडणुकीतील पराभव स्वीकारत प्रथमच या निवडणुकीनंतर विखे यांनी शिर्डीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना विखे म्हणाले, गणेश कारखाना भाडेतत्वावर घेतलेल्या कराराची मुदत संपली असली तरी कराराची मुदत वाढवण्याचा अधिकार हा विखे पाटील कारखान्याचा होता. मात्र गणेशच्या सभासदांचा कौल आम्ही मान्य केला आहे.

निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचीत संचालक मंडळाने हा गणेश कारखाना चालवावा. तसेच आमच्या करारची कोणतीही अडचण त्यांना येणार नाही. गणेश कारखान्याकरीता आमची नेहमीच सहकार्याचीच भूमिका राहील असे मत यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

साईबाबा संस्थेतही ‘त्या’ कर्मचाऱ्यांना दिलासा

शिर्डी साईबाबा संस्थान मध्ये ठेकेदारी पध्दतीने कर्मचारी भरण्याची पध्दत सुरू झाल्याच्या चर्चेने कामगारांमध्ये अस्वस्थता आहे. याबाबत आज संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवा शंकर यांच्या समवेत चर्चा झाली आहे. मात्र असा कोणताही प्रस्ताव नाही किंवा त्या पध्दतीचा अवलंब होणार नसल्याची ग्वाही संस्थानच्या वतीने देण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

शंभर टक्के मंत्री म्हणून शपथ घेणार, आमदार संतोष बांगरांचा मंत्रीपदावर दावा, शिंदेंचं टेन्शन वाढलं

उत्सवाच्या निमित्ताने साईसेवक नेमले जातात त्यांचे कामही मर्यादीत कालावधीसाठी असते.याचा परीणाम सध्याच्या कर्मचार्यांवर होणार नाही.तशी अंमलबजावणी करण्याचा संस्थानचा मानस असल्याकडे लक्ष वेधून भोजन गृहाचा विस्तार करण्यासाठी शेती महामंडळाच्या जमीनीबाबत प्रस्ताव आल्यास त्याचा सकारात्मक विचार करणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube