शिर्डी मतदारसंघ खुला होणार; अहिल्यानगर मतदारसंघ राखीव होणार; रामदास आठवलेंचा वेगळाच तर्क

Ramdas Athawale: दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असा संघर्ष न करता सर्व राजकीय पक्षांनी परिसीमन विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Ramdas Athawale

Ramdas Athawale On Delimitation: केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या बाबतीत अहिल्यानगरमध्ये मोठे विधान केले आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मतदारसंघाचे आरक्षण बदलणार आहे. त्यात सध्या एससीसाठी राखीव असलेल्या शिर्डी मतदारसंघ खुला होणार आहे.तर अहिल्यानगर मतदारसंघ राखीव होऊ शकतो, असा अंदाज रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे वेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

अहिल्यानगर येथील आंबेडकरी चळवळीचे नेते अशोक गायकवाड यांचे निधन झाले आहे. अशोक गायकवाड हे एकेकाळी रामदास आठवले यांचे सहकारी राहिलेले आहेत.आठवले यांनी गायकवाड कुटुंबाची भेट घेत त्यांचे स्वांत्वन केले आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी महिला आरक्षण, लोकसभा मतदारसंघाचे परिसीमन आणि आरक्षण उपवर्गीकरणावर आपली भूमिका मांडली. महिला आरक्षण लागू करण्यासाठी लोकसभा मतदारसंघाचे परिसीमन करावे लागेल. परिसीमनाला माझा विरोध नसल्याचे आठवले म्हणाले.यामुळे सर्व राज्यांमध्ये लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाढणार आहे. त्यामुळे दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असा संघर्ष न करता सर्व राजकीय पक्षांनी परिसीमन विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सध्या राज्यात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा गाजत आहे. त्यावर आठवले म्हणाले, मातंग आणि इतर वंचित समाजांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळत नाही. पण काही धोके ही त्यांना सांगितले. भविष्यात उपवर्गीकरण करून एखाद्या समाजासाठी स्वतंत्र जागा निश्चित केल्या. पण त्या जागांसाठी आवश्यक पात्र उमेदवारच उपलब्ध झाले नाहीत, तर त्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरक्षणासोबतच शिक्षणाचा विस्तार आणि सामाजिक विकासावर भर देणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाचे उपवर्गीकरण करताना मातंग समाजावर अन्याय होऊ नये आणि त्याचवेळी बौद्ध समाजचेही नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे, अशी आठवले म्हणाले.

2009 च्या लोकसभा निवडणुकीला शिर्डी मतदारसंघ एससीसाठी राखीव झाला होता. तेव्हा या मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून रामदास आठवले हे रिंगणात उतरले होते. परंतु शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर ते 2014 ला भाजपमध्ये गेले आणि राज्यसभेचे खासदार होऊन केंद्रात राज्यमंत्रीही झाले. तरीही शिर्डीतील लोकसभा मतदारसंघातील पराभवाची सल त्यांच्या मनात होती. ती अनेकदा त्यांनी जाहीर कार्यक्रमातून बोलून दाखविली आणि पुन्हा शिर्डीतून लढण्याचा निर्धार केला होता.परंतु ते पुन्हा शिर्डीच्या रिंगणात उतरले आहेत. आता अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ राखीव होईल, असा दावा करत पुन्हा एकदा रिंगणात उतरणार असल्याचे एकप्रकारे संकेतही आठवले यांनी दिलाय. हा मतदारसंघ युतीत भाजपकडे आहे. आठवले यांनी अहिल्यानगर मतदारसंघ राखीव होईल, असा दावा आठवले यांनी केला आहे.

follow us