अहमदनगरकरांना शासनाची प्रतिक्षा कायम; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलला

अहमदनगरकरांना शासनाची प्रतिक्षा कायम; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलला

Ahmednagar Shasan Aaplya Dari : राज्याचा बहुचर्चित असा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नगर जिल्ह्यात देखील पार पडणार आहे. मात्र हा कार्यक्रम सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शासनाचा या नियोजित कार्यक्रमाची तारीख पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतपर्यंत दोनदा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. उद्या म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र आता हा कार्यक्रम येत्या 17 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यासाठी मोठा खर्च देखील शासनाकडून केला जात आहे. (Shasan Aaplya Dari Postpond in Ahmednagar CM Shinde, DCM Fadanvis and Ajit Pawar )

मोदी सरकारचा सरन्यायाधीशांना बाहेरचा रस्ता; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात केला थेट बदल

‘शासन आपल्या दारी’ राज्याच्या या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे स्वतः राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवित आहे. विविध शासकीय योजनांच्या प्रमाणपत्रांचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते केले जाते. तसेच याच कार्यक्रमात शासनाच्या योजनांची माहिती देखील दिली जात आहे. मात्र हे सगळं सुरु असताना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात या कार्यक्रमाची तारीख आतापर्यंत दोनदा पुढे ढकलण्यात आली आहे.

‘शिंदे साहेब, सत्तेची नशा…’ आमदाराच्या धमकीनंतर पत्रकाराला मारहाण, रोहित पवारांचं टीकास्त्र

यापूर्वी हा कार्यक्रम सोमवारी (ता. 7) रोजी शिर्डीमध्ये पार पडणार होता. मात्र तो रद्द झाला व नवी तारीख समोर आली. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार असल्याचे बोलले जात होते. विशेष म्हणजे खुद्द महसूलमंत्र्यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती व हि तारीख निश्चित राहील असेही ते म्हणाले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्याला दोन दिवस देखील उलटले नाही तोच पुन्हा एकदा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. सात्यत्याने हा कार्यक्रम पुढे ढकलला जात असल्याने प्रशासनाची देखील नाचक्की झाली असल्याचे समोर येऊ लागले आहे.

अनेक दिवसांपासून या ठिकाणी उभारलेला मांडव मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा करत आहे. मात्र आता 17 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार असल्याचं बोललं जातं आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम दोनवेळा पुढे ढकलण्यात आला. मात्र आता 17 ऑगस्ट रोजी शिर्डीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी लाभार्थ्यांना आणण्यासाठी विशेष बसचे आयोजन केले असून, कोट्यवधी रुपयांच्या खर्च यासाठी प्रशासन करणार आहे.

लाभार्थ्यांसाठी 600 बसेसची सोय
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 30 हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातून लाभार्थ्यांना कार्यक्रमास येता यावे यासाठी 600 पेक्षा अधिक एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल व समन्वयक अधिकाऱ्यांनी गावनिहाय रूटप्लॅन, लाभार्थी वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचतील यादृष्टीने नियोजन करावे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube