महसूलसह पोलिसांना वेठीस धरणारा शेवगावचा ‘तो’ तरुण हद्दपार
Ahmednagar News : शेवगाव शहरातील एका तरुणाने गेल्या काही दिवसांपासून पोलिसांसह महसूल प्रशासनाला जेरीस आणून सोडले आहे. विशाल विजयकुमार बलदवा (रा. श्रीराम कॅलनी, शेवगाव) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विघातक कृत्याला व गुन्हेगारी वृत्तीमुळे विशाल याला जिल्ह्यातून हद्दपार करावा, असा प्रस्ताव शेवगाव पोलिसांनी पाथर्डी प्रांताधिकारी यांचेकडे दाखल केला होता. दरम्यान प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी विशाल बलदवाला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत.
शहरात विशालची वाढती दहशत
शेवगाव शहरातील श्रीराम कॉलनी मध्ये राहणार विशाल हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्यावर शेवगाव पोलिस ठाण्यात यापूर्वी अनेक गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे. त्याच्या वागण्यामुळे समाजविरोधी व विघातक कृत्यांना प्रोत्साहान मिळत आहे. दरम्यान आपल्यावर कारवाईच होत नसल्याने त्याच्या कृत्यानं बळ मिळत होते. विशाल हा लोकांमध्ये दहशतीचा व चिंतेचा विषय झाला आहे.
‘आता त्यांना आनंद घेऊ द्या मी व्यत्यय आणणार नाही पण, वेळ आल्यावर’.. विखेंचा थोरातांना इशारा
विशालच्या वागण्यामुळे स्थानिक व परिसरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका स्वीकारली होती. संतप्त नागरिक आंदोलन करणे, मोर्चा काढणे, रास्तारोको करणे असे प्रकार करण्याची शक्यता आहे. यामुळे शेवगाव शहरासह तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तो कोणताही कामधंदा करत नसून त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक स्त्रोत नाही.
इंदुरीकर महाराजांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक
गुन्हेगारी वृत्तीचा
विशाल हा गुन्हेगारी स्वरूपाचा इसम असून त्याच्यावर गुन्हे दाखल आहे. मात्र तो कायदा व सुव्यवस्थेला पायदळी तुडवत असल्याने गंभीर गुन्हे करणे हा त्याच्या सवयीचा भाग झालेला आहे. त्याच्या दबाव व भितीपोटी त्याच्या विरोधात कोणीही जबाब देण्यास तयार होत नाही. त्यामुळे विशाल बलदवा यास दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करावे, असा प्रस्ताव शेवगाव पोलिस निरीक्षकांनी प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केला होता. यावर प्रांत मते यांनी विशाल बलदवाला अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेशात म्हटले आहे.